अकोला जिल्हा तंबाखूमुक्त शाळा मोहीमेची आढावा बैठक संपन्न

0
940
Google search engine
Google search engine

आकोट/ प्रतीनीधी

अकोल्या जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या याकरिता सलाम मुंबई, प्राथमिक व माध्यमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य यांची तंबाखूमुक्त शाळा मोहीमेची आढावा बैठक नुकतीच सर्व तालुक्या मध्ये घेण्यात आली आहे. यात दिनांक १७/१२/२०१८ ते २०/१२/२०१८ या कालावधीत अकोला,बाळापुर,बार्शीटाकळी,पातुर,मुर्तीजापुर,अकोट,तेल्हारा या तालुक्यात अकोल्या जिल्यातील संपूर्ण शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या या करीता केंद्र प्रमुख व तंत्रस्नेही शिक्षकांनसाठी अकोला जिल्यात सर्व तालुक्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेत सलाम मुंबई फौंडेशन चे प्रतिनिधी सचिन वानखडे आणि उन्नती संस्था आडगाव बु या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच प्राथमिक व माध्यमिक चे अधिकारी वर्ग व अकोला जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभागाचे समुपदेशक हजर होते.
आपले केंद्र तालुका लवकरच तंबाखूमुक्त व्हावा यासाठीचे मार्गदर्शन व ११ निकष कशा पद्धतीने पूर्ण करायचे आहे.याबाबतव पूर्ण केलेल्या निकषांची माहिती अॅपवर कशी भरायची आहे. या विषयी संपूर्ण माहिती सचिन वानखडे यांनी दिली.असे उन्नती संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.