बाळापूर पोलीसांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सोबतीने रोखला बालविवाह

0
648
Google search engine
Google search engine

अकोला/ प्रतीनिधी

बाळापूर पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पुढाकाराने बालविवाह रोखला जाऊन अवेळी होणाऱ्या विवाह थांबवण्यात यश मिळाले आहे.पोलीस सुत्रानुसार
बाळापूर येथील जुनी चावडी परिसरातील एका हॉल मधे 18।1।19 रोजी अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती अकोला येथील बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांना मिळाली.त्यांनी लगेच ही माहीती बाळापूर पोलिसांना दिली. बाळापूर पोलिसांनी लगेच अॕक्शन घेत त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांना तसेच मुलाच्या पालकांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना कायद्याची जाणीव करून दिली यादरम्यान तपासणीत पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी मुलीची जन्म तारखेची पडताळणी केली असता सदर मुलगी 15 वर्ष 4 महिन्याची असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तातडीने हालचाल करून मुलीच्या वडिलांना तातडीने बोलावून त्यांना कायद्याची जाणीव करून दिली असता त्यांनी सदर विवाह करणार नसल्याचे लेखी दिले .त्यामुळं बाल संरक्षण कक्ष व बाळापुर पोलीसांच्या पुढाकारात बालविवाह होण्यापासुन वाचला.सदर प्रकरणी बाळापूर पोलीस लक्ष ठेवून आहेत.पोलीसांच्या या तत्परतेने एक प्रकारे सार्थक जननी मोहीम राबवल्याचे दिसुन येत आहे.