अशा पोकळ धमक्याला मी घाबरत नाही- हुकमत मुलाणी ; कोंडमध्ये दारुबंदीसाठी पोलिसांची तगडी फिल्डिंग

0
796
Google search engine
Google search engine

अशा पोकळ धमक्याला मी घाबरत नाही- हुकमत मुलाणीकोंडमध्ये दारुबंदीसाठी पोलिसांची तगडी फिल्डिंगसहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांनी घेतली बैठक

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे अवैद्य दारुविक्री बंद करण्यासाठी गाव दारुबंदी समीती तयार केल्यामुळे अवैद्य दारुविक्री करणार्या धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.कोंड येथे पाणि कमी पण दारु जास्त अशी आवस्था निर्माण झाली होती .गल्ली बोळात मज्जीद परिसर , बस स्टँड ,पाण्याची टाकी , तळ्याजवळ ,नितळी रोड ,सरकारी दवाखान्या जवळ या भागात दारूचा महापूर आला होता.सध्या गावतील काही ठिकाणचे धंदे बंद झालेत आहेत तर काहि ठिकाणी छुपे रुस्तम हातभट्टी ‘देशी दारुच्या बाटल्याची विक्री सुरु आहे . या धंदेवाल्यावर कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे लवकरच कार्यवाही होणार आहे.नंदू शिंदे या दारु विक्रेत्याकडून दारुबंदी अध्यक्षांना धमकिही दिली होती.त्याच्या ढोकी पोलिसांनी मुसक्याही आवळल्या आहेत . ता १६/१/२०१९(बुधवार) रोजी ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्क पोलिस निरिक्षक गणपत जाधव यांनी कोंड येथिल ग्राम पंचायतमध्ये दारुबंदीची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेत यापूढे अवैद्य दारुविक्री करणार्यावर पंचाच्या स्वाक्षर्या घेऊन कार्यवाही करण्याचे ठरले आहे.त्यामुळे आता कोंड गावाची दारु कशी बंद होत नाही असा निरधार दारुबंदी समीतीनी केला आहे.

अशा पोकळ धमक्याला मी घाबरत नाही – हुकमत मुलाणी

नुकतीच दारुबंदी समीतीची ग्रामसभेत निवड करण्यात आली आहे यात दारुबंदी गाव समीतीच्या अध्यक्षपदी हुकमत मुलाणी तर उपाध्यक्षपदी शिवाजी लोंढे यांची निवड करण्यात आली आहे या समीतीत आठारा सदस्य आहेत. मला काल नंदू शिंदे याने दारुविक्रीच्या मुद्यावर धमकी दिली होती परंतू अशा कितीही धमक्या आल्या तरी मी घाबरत नाही सगळ्या धंदेवाल्यांच्या नांग्या दाबण्यासाठी आमची समीती खंबीर आहे दारुबंदीच्या केसेस पंचामुळे सुटत अल्यामुळे न फुटणारे पंच व साक्षिदार देण्याचे जाधव साहेबांनी आवाहन केले होते .आम्ही त्यांना चांगले पंच व साक्षिदार देण्याची जबाबदारी घेतली आहे आशी प्रतिक्रीया दारुबंदी समितीचे अध्यक्ष हुकमत मुलाणी यांनी दिली आहे