आकोट तालूक्यातील क्रीडा संकूलाच्या दुर्दशेबाबत प्रहारचे निवेदन

0
790
Google search engine
Google search engine

आकोट/ प्रतीनीधी

तालूक्यातील क्रीडा संकूलाच्या दुर्दशेबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असुन क्रीडा संकूलातील सर्वच कामांची दुर्दशाअसल्या बाबत प्रहारने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात प्रहारने दुर्दशा झालेल्या कामांच्या बाबत यादीच दिली आहे सर्व कामे अपुर्ण आहेत त्यामुळे शहरातील युवक व युवती
यांचे सैनीक भरती , पोलीस भरती रेल्वे भरती, व खेळाडू यांना आवश्यक असलेली प्रॅक्टीस व कसरत होत नसल्याने त्यांचे शैक्षनीक नुकसान होत आहे.क्रीडा संकुलाची नमुद सर्व कामे 15 दीवसांचा मुदतीत पुर्ण न झाल्यास शहरातील युवकांच्या भवीष्याचा प्रश्न असल्याने प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडन्यात येईल. असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार बच्चूभाऊ कडू यांचा आदेशाने व जिल्हाप्रमुख मा.तुषारभाऊ पुंडकर यांच्या मार्गदर्शनात.शहरप्रमुख सागर उकंडे आनी शहर कार्याध्यक्ष विशाल भगत यांच्या नेतृत्वात देन्यात आले यावेळी
रीतेश हाडोळे , रूषीकेश हरने , शिवा चींचोळकार दिपकभाऊ जायले , समीर जमदार ,योगेश वनकर ,धीरज बाळे , प्रकाशभाऊ डावखरे हे व प्रहार पदाधीकारी आनी कार्येकर्ते उपस्थीत होते.
प्रहारने मागणी केलेल्या कामांमध्ये
1) 200 मी.ट्रॅकचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे ट्रॅकवर दगड व रेती आहे ट्रॅक एकदम कडक आहे
2) 100 मी. धावपट्टीचे काम अपूर्ण आहे .
3) लांब उडीचे मैदान झालेले नाही.
4)कबड्डी , खोखो , हाॅलीबाॅलचे मैदान अपूर्न आहे.
5) सिमेंटरोड निक्रृष्ट दर्जाचा झाला आहे.
6) बास्केट बाॅलचे मैदान निक्रृष्ट दर्जाचे झालेले आहे.
7) प्रशासकीय ईमारत मोडकडीस आलेली आहे.
8) मैदानावर इलेक्ट्रीकची व्यवस्था नाही.
9) पिण्याचा पान्याची व्यवस्था नाही.
10) व्यायाम शाळेची इमारत तयार झाली परंतू व्यायामाचे कोनतेही साहीत्य उपल्बनाही व ईमारत बंद आहे.
11) चौकीदाराची व्यवस्था नाही त्यामुळे लोखोरूपयांची सरकारी मालमत्ता बेवारस पडलेली आहे.या कामांची मागणी आहे.