कृष्णेच्या निवडणुकीत मोहिते-भोसले सोडून चर्चा : अविनाश मोहिते : आधुनिकीकरणावरील खर्च व्यर्थ : कारखान्यात आर्थिक अस्थिरता

0
1412
Google search engine
Google search engine

गेल्या दोन वर्षात आधुनिकीकरणच्या नावाखाली ७० कोटी रूपये खर्च करून कारखाना पूर्वी इतक्या क्षमतेने चालत नाही. त्यामुळे आधुनिकीकरणावरील खर्च व्यर्थच गेला आहे. याचा परिणाम कारखान्याच्या अर्थकारणावर होवून आर्थिक अस्थिरता आली आहे. एफआरपीनुसार दर नाही, कामगार पगार वेळेवर नाहीत, कामगारांना बोनस नाही. त्यामुळे सभासद शेतकरी संतप्त झाला आहे. त्यामुळे वर्षभरात येवून ठेपलेल्या कारखान्याच्या निवडणूकीसाठी मोहिते-भोसले सोडून सर्व पर्याय चोखळणार असून तशा पध्दतीने सर्वांशी चर्चा करणिर असल्याचे संस्थापक पँनेलचे प्रमुख आणि यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सांगितले. कृष्णा कारखान्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थापक पँनेलचे सर्व संंचालक उपस्थित होते.अविनाश मोहिते म्हणाले, कृष्णा कारखान्यात गेल्या अनेक वर्षापासून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी गेल्या हंगामातील गाळलेल्या ऊसाचे संपूर्ण बिल देण्यात येत होते. कितीही अडचणी असल्यातरी संस्थापक पँनेलच्या कार्यकाळात एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर दिली आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांना अजून गेल्या वर्षाची रक्कम मिळालेली नाही. तसेच यंदाची पूर्ण एफआरपी मिळालेली नाही. कामगारांना महिन्याच्या महिन्याला पगार नाहीत. जाहीर केलेला बोनस नाही. वेतन वाढीतील फरक मिळालेला नाही. गेल्या दोन वर्षात आधुनिकीकरणाच्या नावाखाली ७० कोटी खर्च केला आहे. तो खर्च टाळला असता तर ही वेळ कारखान्यावर आली नसती. शिवाय एवढा खर्च करूनही कारखाना पूर्वी एवढ्या क्षमतेने चालत नाही. खासगी कारखाना जोमात चालविण्यासाठी कृष्णा कारखान्याची ही अवस्था करून ठेवल्याचा आरोप केला.ते म्हणाले, सन २०१५ च्या कारखाना निवडणुकीत भाजप सरकारच्या आश्रयाला गेलेल्या भागातील भांडवलदारी मानसिकतेच्या पै-पाहुण्यांमार्फत सरकारी अधिकारी यांना हाताशी धरून आपल्या मालकीचा खासगी साखर कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून सभासद शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सध्या सत्तेवर असणाऱ्यांंनी गेल्या चार वर्षात सभासद शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे सभासद संतप्त झाला आहे. आम्ही कोणत्याही हिंसेचे कधी समर्थन करत नाही. सभासदांनी सनदशीर व लोकशाही मार्गाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात. मात्र कृष्णा कारखान्याच्या इतिहासात गट कार्यालये जाळण्याएवढी वेळ शेतकऱ्यांवर आली. याला सर्वस्वी कारखान्याचे अध्यक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे येत्या काळात कारखान्याच्या विविध प्रश्नांवर सभासदामध्ये जावून प्रबोधन करणार आहे. तसेच वेळ प्रसंगी जन आंदोलन उभारणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.ते म्हणाले, आमच्या कार्यकालात कारखाना व्यवस्थित सुरू होता. आम्ही गेटकेन ऊस वाहतूक बंद केली होती. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्राधान्य दिले. उपसा सिंचन योजनांंना भांडवली गुंतवणूक केली. सभासदांना साखर दोन रुपये किलो दराने गावात पोहचविण्याची व्यवसाय केली. एका गळीत हंगामात राज्यात तीन क्रमांकाचा ऊसदर दिला. सहवीज प्रकल्प ८०टक्के पेक्षा जास्त कर्जमुक्त केला. डिस्टीलरीचा नफा अडीच कोटींवरून २४ कोटीवर पोहचवला. कामगारांना २५ टक्के बोनस दिला. तसेच कारखाना सलग तीन वर्ष १०० टक्के क्षमतेने चालवला.आगामी कारखाना निवडणुकीत आपली भूमिका काय असणार या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कृष्णेचा सभासद सध्याच्या कारखाना व्यवस्थापनावर प्रचंड नाराज आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. कामगारांना पगार नाही, बोनस नाही, सुड बुध्दीने ऊस वाळवला जात आहे. सिंचन योजनांचा बोजवारा उडाला आहे. कारखान्यात सातत्याने बिघाड होत आहे. हे सर्व खासगी कारखान्याला पोसण्यासाठी केले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोहिते;भोसले सोडून सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.चौकटतो तर जिल्हा बँकेवर दरोडाऊस बिल देण्यासाठी जिल्हा बँकेच्या ताब्यातील साखर बँकेच्या परवानगी शिवाय विकली. याबाबत बोलताना मोहिते म्हणाले, ही गंभीर बाब आहे. जिल्हा बँकेकडे तारण असलेली साखर बँकेच्या परवानगी शिवाय विकता येत नाही. मात्र, ती परस्पर विकण्यात आली. हा तर जिल्हा बँकेवर टाकलेला दरोडा आहे.