व्यक्तिमत्त्व विकास ही यशाची गुरूकिल्ली — सलील चिंचमलातपुरे

0
1565

“व्यक्तिमत्त्व विकास ही यशाची गुरूकिल्ली ” मा.श्री.सलील चिंचमलातपुरे

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /
दत्तक ग्राम लाडकी (बु) येथे संपन्न होत असलेल्या भारतीय महाविद्यालय मोर्शी च्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर अंतर्गत दिनांक 12/0 1 /2019 ला बौद्धीक सत्रा मध्ये व्यक्तिमत्व विकास या विषयावर श्री. मा. सलील चिंचमलातपुरे (सचिव भारतीय विद्यामंदीर अम.) यांचे मार्गदर्शन विद्यार्थी तथा गावकरी यांना प्राप्त झाले .

व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन करताना सलील चिंचमलातपुरे यांनी व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा ,स्वतःमध्ये बदल कसे करावे ,व स्पर्धात्मक युगात स्वतःला कसे सज्ज करावे, या सोबत मुलाखतीसाठी स्वतःला कसे सिद्ध करावे या सर्व बारीक सारीक बाबींचा उहापोह केला, पुढे आपल्या मार्गदर्शनात श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व ,त्यांचे नियोजन, स्वराज्य प्रेम, रयतवरील प्रेम, मोठ-मोठे आव्हानांना त्यांनी कशापद्धतीने पार पाडीत यश मिळवे यांचा आढावा घेतला. स्लाईड शो च्या माध्यमातुन सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले .

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर. जी. बांबोडे तर प्रमुख अतिथी गंगाधरराव भुयार ,डॉ. संदीप राऊत(राःसे.यो. कार्यक्रम अधिकारी )कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनश्याम दाने यांनी केले संचालन कू. काजल वानखडे यांनी केले तर आभार कु .स्वामींनी वरघट यांनी केले.
सदर कार्यक्रमास रासेयो स्वयमसेवक ,प्राध्यापक वर्ग व ग्रामस्थ हजर होते.