रुद्राक्षा फौंडेशनमार्फत सांगली शहरात मतदार दिनानिमित्त जनजागृती

Google search engine
Google search engine

रुद्राक्षा फौंडेशनमार्फत दि.२५ जानेवारी रोजी सांगली शहरात ठिकठिकाणी मतदार दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. यावेळी रुद्राक्षा फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा काजल हवलदार व फौंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी संस्थापिका काजल हवलदार यांनी १८ वर्षापुढील सर्व तरुण-तरुणींना, तसेच रिक्षा चालकांना, महिला व पुरुषांना, वृद्धांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच रुद्राक्षा फौंडेशन व सई स्केटिंग अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी स्टेडियम सांगली येथे लहान मुलांसह स्केटिंगवर रॅली काढून “मेरा वोट, मेरा राज” अश्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली.यावेळी काजल हवलदार म्हणाल्या, मतदान करणे ही आपली एक जबाबदारी आहे, ती आपण व्यवस्थित व निस्वार्थी वृत्तीने पार पडायला हवी. आपले एक मत हे देश घडविण्याचे काम करते, त्यामुळे ते उगाच वाया घालवू नये. नाहीतर आज काल 500 -1000 रुपायांसाठी मत विकण्याची पद्धत निघाली आहे. 5 वर्षकरिता 1000 रुपये म्हणजे वर्षाला 200 रुपये, याचाच अर्थ दिवसाला फक्त 55 पैसे…याउलट दारात येणाऱ्या कुत्र्याला आपण चतकोर भाकरी टाकतो. एक भाकरी 10 रुपये म्हणजे चतकोर भाकरी 2.50 रुपये. आपण महिन्यात 4-5 भाकरी सहज कुत्र्याला टाकत असू. म्हणजे वर्षाला त्या भाकरीला 600 रुपये जातात आणि आपण आपले मत फक्त 1000 रुपयांत विकून देशाला अधोगतीच्या रस्त्यावर नेऊन सोडण्याचे काम करतो. म्हणून आता तरी जागे व्हा आणि सुजाण मतदार व्हा. कारण खरा मतदार तोच असतो जो जो आपले मत न विकता, ते मत देशाच्या प्रगतीसाठी वापरतो, असे त्यांनी सांगितले.यावेळी काजल हवलदार, योगिता जाधव, स्केटिंग प्रशिक्षक सूरज शिंदे व परवीन शिंदे, सर्व स्केटर्स, रजनीश, दीपिका साळुंखे, तसेच पालक व इतर सर्व खेळाडू उपस्थित होते.