कडेगाव नगरपंचायतीस संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रयत्नाने एक कोटीचा निधी.

Google search engine
Google search engine

कडेगाव. येथील जगप्रसिद्ध मोहरमच्या ताबूत भेटि होतात त्या सुरेशबाबा देशमुख चौकातील सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटि रुपयांचा निधी सांगली जिल्हा परीषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख. यांच्या प्रयत्नातून. मंजूर झाला आहे.याबाबतचे पत्र जिल्हा अध्यक्ष व नगरपंचायत. यांना. मिळाले आहे.कडेगाव येथे जगप्रसिद्ध हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या मोहरम सणाच्या ताबूताच्या भेटी ज्या ठिकाणी होतात. त्या ठिकाणच्या स्व.सुरेश. बाबा देशमुख चौकात मात्र मोठ्या गैरसोई होत्या. आणि या चौकाच्या सुशोभिकरण करण्या बाबतीत अनेक वषै केवळ राजकीय घोषणाच झाल्या होत्या.मात्र जिल्हा परीषद अध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतल्या नंतर मुस्लिम समाज व हिंदू समाजातील लोकांना आपले ग्रामीण कार्यक्षेत्र नसतानाही जिल्हा नियोजन समितीतून कडेगावातील या ऐतिहासिक चौकाचे सुशोभिकरण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपले आश्वासन पुर्ण केले.नुकतेच नगरपंचायत व जिल्हा अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना एक कोटी रुपयांचा निधी आपल्या मागणीनूसार मंजूर झाल्याचे पत्र मिळाले.या एक कोटी निधितून संपुर्ण चौकातील सिमेंट करण,पेव्हिंग ब्लॉक, यात्रै करीता.येणाऱ्या लोकांना पिण्याची सोय, जुना कराड रस्ता डांबरीकरण,चौकात अजून एक हायमस्ट लँम्प,सध्या मोडकळीस आलेल्या स्टेजचे नुतनीकरण, चौकाच्या कडेने वृक्षारोपण अशी योजना शहरवासीयांची आहे.यासाठी एक कोटी साठ लाख रूपयांची तरतूद जिल्हा नियोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.या बाबतीत नवनवीन प्रस्ताव सादर करण्यात. येणार आहे.या निधी मिळावा यासाठी कडेगाव शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. नगरपंचायतीचे भारतीय जनता पाटीँचे कार्यकर्ते यांच्या बरोबरीने विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले.यासर्व कामाच्या नंतर स्व.सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम भेटीसाठी सुख व सर्व सोईंनी तयार होईल. कडेगावातील बहुसंख्य लोकांची अनेक मागणी पुर्ण होणार आहे.