भारती विद्यापीठ कन्या प्रशाला येथे राष्ट्रीय बालिकादीन मोठ्या उत्साहात संपन्न

0
1226
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय बालिकादिनाचे औचित्य साधून भारती विद्यापीठ कन्या प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण व कन्यारत्न मातांचा ट्राॅफी व पणत्या देवुन सत्कार समारंभ नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.वैशालीताई कदम व सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.मालनताई मोहीते या होत्या तर प्रमुख पाहुणे कडेगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ए एम नाईकवडी होते.यावेळी कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुलक्षणा कुलकर्णी,इग्लीश मिडीयम स्कुलच्या प्राचार्या सौ.सावित्री जाधव,आय टी आय चे प्राचार्य सी.एस भिंताडे उपस्थित होते.प्रारंभी माजी मंत्री व कडेगांव पलुस विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते स्व.आमदार डॉ.पतंगराव कदम, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.प्रास्तविक स्वागत भारती विद्यापीठ कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ एस एम शेख यांनी केले.विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रीय बालिकादिना निमित्त कन्यारत्न मातांचा ट्राॅफी व पणत्या देवुन सत्कार करण्यात आला.आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना मुख्याध्यापिका सौ एस एम शेख म्हणाल्या की,घटत्या मुलींच्या संख्येमुळे विषमता निर्माण झाली आहे.खरेतर मुली व स्त्रीया दोन घरांचा विकास करतात.मुलाची वाट न पाहता ज्या मातांनी मुलींच्यातच समाधान मानले आहे अशा मातांचा सत्कार करणे ही काळाची गरज आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मालनताई मोहीते म्हणाल्या की, मुलींनी खरेतर सक्षमपणे व प्रभाविपणे सर्वच क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे व घेतही आहेत.तीच भरारी घेण्यासाठी जिद्द,चिकाटी व धडपड असली पाहिजे प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे.जीथे जीथे संधी मिळेल तीथे तीथे चर्या संधीचे सोने केले पाहिजे.इत्यादी अनेक गोष्टीवरून स्वानुभव मुलींना पटवुन सांगीतले मा डॉ पंतगराव कदम यांनी मुलींचे शैक्षणिक संकुल उभे केले आहे.त्याचा फायदा मुलींनी व महीलांनीही घेतला पाहिजे असे शेवटी त्यांनी आपले मत व्यक्त केले.गटशिक्षणाधिकारी ए एम नाईकवडी यांनी ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग सांगीतले व कर्तबगार स्त्रीयांचे वर्णनही मुलींच्यापुढे कथन केले.अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ वैशालीताई कदम यांनी सांगितले की,मुलीच आई वडील यांची उत्तम प्रकारे काळजी घेवु शकतात व समाजात परिवर्तन घडवून आणु शकतात.या कन्या प्रशाळेने अतिशय चांगला उपक्रम राबविल्याबद्दल मनापासून धन्यवाद दिले व कौतुकही केले.त्याचबरोबर रांगोळी व विज्ञानप्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते आभार एस.पी सुर्यवंशी यांनी मानले तर सुत्रसंचालन कु.एस.ए.संदे यांनी केले