सेदानी इंग्लिश स्कूल मध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर

0
958
Google search engine
Google search engine

रीटार्यड कमांडर ठाकरे यांचे सैन्य दलातील संधींबाबत मार्गदर्शन

आकोट/ ता.प्रतीनीधी

स्थानिक दिवानीबेन सेदानी इंग्लिश स्कूल अकोट येथे मंगळवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करीता करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी करिअर मार्गदर्शन शिबिराला मुख्य अतिथी म्हणून रिटायर कमांडर पि. पी .ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या समवेत एस.एस.दाळु,पि.ए.पाचकोर, नितीन ठाकरे हजर होते

यावेळी सैन्य दलातील विविध पद भरती पात्रता लेखी परीक्षा इत्यादीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष सौ.स्मिता सेदानी , सुरेश सेदानी ,प्राचार्य विजय भागवतकर व इतर शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दहावी बारावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या शिबीरातुन विद्यार्थ्यांनी आपले करीअर बनवतांना सैन्य दलातील संधीबाबतही जागृक असावे असे मनोगत संस्थाध्यक्षा स्मिता सेदानी यांनी व्यक्त केले.