जागजीच्या हातभट्टी दारुची कोंडकरांना नशा !

0
799
Google search engine
Google search engine

जागजीच्या हातभट्टी दारुची कोंडकरांना नशा !

उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातील अवैद्य हातभट्टी दारु विक्रेत्यांची मुजोरी वाढली तर आहेच परंतू जागजीच्या हातभाट्टी दारुची कोंडकरांना चांगलीच नशा येत आसल्याचे चित्र कोंडमध्ये पहायला मिळत आहे.गेल्या अनेक वर्षापासून कोंड गावासोबत जागजीकरांची कोंडकरासोबत हात्तभट्टी व्यवसायात चांगलेच सुत जुळले आहे.अगदी ईमानदारीने जागजी येथून दररोज दिवसाढवळ्या हात्तभट्टी दारुचे ट्युब पिशवीमध्ये ,सिमेटच्या पांढर्या रंगाच्या पोत्यात घालून मोटारसाकलवर एक पाठिमागे लहान मुलगा बसवून एक ईसम हि हातभट्टी दारु कोंडमध्ये पार्सल करत आहे. हि जागजीची दारु कोंडमध्ये दररोज किमान दोन बँरल विक्री केली जात आसल्याची चर्चा आहे.या दारुची वाहतुक करणार्या मोटारसाकलचा वेग हा अतिशय असतो.गेल्या वर्षी कोंड येथील पुलावर एका मोटार सायकलचा आपघात झाला होता.त्यावरील ट्युब हे फुटले होते तर सर्व परिसरात दारुचा सुगंध दरवळत होता.तो प्रकारही गुलदसत्यातच ठेवून त्या प्रकरणाचा रफादफा करण्यात आला होता.परंतू सध्या कोंडमध्ये खुलेआम तर विक्री सुरुच आहे पण काही चोरट्या मार्गाने प्लँस्टिकच्या पिशव्यामधून दारु विक्री होत आहे.त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी कोंडवाशीयाकडून केली जात आहे.