नरखेड तालुक्यातील  नागरिक प्रशिक्षनाकरिता रवाना  ! दुष्काळमुक्तीसाठी नरखेड तालुक्यात जलसंधारणाची चळवळ ! वॉटर कप स्पर्धेमध्ये नरखेड तालुक्यातील ९७ गावातील नागरिकांना मिळणार प्रशिक्षण  !

0
796
Google search engine
Google search engine

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून नरखेड तालुक्यातील नागरिक होत आहे प्रशिक्षित !

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामध्ये सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा !

वॉटर कप स्पर्धेमध्ये नरखेड तालुक्यातील ९७ गावातील नागरिकांना मिळणार प्रशिक्षण !

दुष्काळमुक्तीसाठी नरखेड तालुक्यात जलसंधारणाची चळवळ !

तालुक्यातील नागरिक प्रशिक्षनाकरिता रवाना !

नरखेड तालुका प्रतिनिधी /

महाराष्ट्र राज्यात लोकसहभागातून पाणलोट आणि जलसंधारणाची मोठी चळवळ उभी करण्यात यशस्वी ठरलेल्या अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा या वर्षी राज्यातील ७६ तालुक्यांत घेतली जाणार आहे. वाॅटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात (२०१९) राज्यातील १५ हजार गावांना दुष्काळमुक्तीची संधी उपलब्ध हाेणार आहे त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याचा समावेश आहे .

‘पाणी फाऊंडेशन’ हे नरखेड तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी गावागावात लोकांना प्रोत्साहित करून मृद व जलसंधारण, पाणलोट व्यवस्थापनाची शास्रशुद्ध पद्धत, उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षण देणार आहे. त्यातून गाव, तालुका टँकरमुक्त करणे, जलसंधारण कामाची लोकचळवळ, गावाच्या विविध प्रश्नांवर काम करणा-या सेवाभावी संस्था, लोक सहभागातून उभी केली आहे. स्पर्धेच्या काळात जलसंधारण, आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या गावांसाठी ही स्पर्धा असून याची आतापासून तालुक्यातील सर्व गावांना तयारी करावी लागणार आहे. प्रत्यक्ष स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान असणार आहे. यात नरखेड तालुक्यातील ९७ गावांनी सहभाग नोंदवला आहे . सिने अभिनेता आमिर खान, किरण राव , सत्यजित भटकळ , डॉ अविनाश पोळ , व पाणी फाउंडेशन टीम यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाबाबत नरखेड तालुक्याला उत्सुकता लागली आहे. या ९७ गावातील प्रशिक्षणार्थ्यांना आयोजित प्रशिक्षणामध्ये पाणी फाउंडेशन ची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत .

नरखेड तालुक्यातील खरसोली , गायमुख , रामठी , राणवाडी ,बरड पवनी , पिंपळा खुर्द , तारा , आरंभी , या ८ गावातील ४२ प्रशिक्षणार्थ्यांमध्ये १७ महिला आणि २५ पुरुष मंडळींना वरुड तालुक्यातील सावंगा येथील ट्रेनिंग सेंटरवर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आहे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नरखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दयाराम राठोड ,तालुका कृषी अधिकारी आटे साहेब , पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षणाला जाणाऱ्या वाहनाला हिरवी झंडी दाखवून प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणासाठी रवाना केले त्यावेळी नरखेड तालुक्यातील मान्यवर मंडळी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .