अबॅकस मध्ये चांदूर रेल्वे च्या विद्यार्थ्यांचे यश

0
632
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
  राष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रोअॅक्टिव्ह अबॅकस या राष्ट्रीय कंपनीतर्फे राष्ट्रीय पातळीवरची विभागीय स्तरावरची स्पर्धा नुकतीच अमरावती येथे आयोजित केली होती. यात चांदूर रेल्वे येथिल इंडिया कम्प्युटेक अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश संपादन केले.
      या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची ट्रॉफी साहिल वानखडे, अनुकल मिरासे  पल्लवी कुबडे, अनुश्री चौधरी, वैभव गाढवे, श्रेया डोंगरे, आर्या महिंद, रिदम सोळंके, अथर्व जळीतकर, ईशा गोंडाने, प्रथमेश धांदे, प्राची धांदे या बारा विद्यार्थ्यांनी मिळवली तर अफान अफरोज अहेमद, समती ढगे, गौरी बेलसरे, श्रावण सहारे,  आरव चांडक, हितांश चंदाराणा, मृण्मयी माकोडे, वरूण माकोडे, अनुज मोहतुरे, यतिका मेश्राम, पियुश मानकानी, प्राची भैसे, नमन भूत, चिन्मय भोयर, स्वस्तिका मेहेरे, रेवती गायकवाड, ओमी मानकानी, शर्वरी सराड, देवांश शेळके, चिन्मय वानरे, श्रुती राऊत, तिर्थेश जैन, रेणुका गायकवाड, नयन चांडक, तन्मय भूत या विद्यार्थ्यांनी चांगली रँक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील तसेच अबॅकसचे शिक्षक आशिष जोशी यांना देते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.