चांदूर रेल्वेत रेकॉर्डब्रेक २२३ बॉटल रक्तदान – नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे रक्तदान शिबीर

0
603
Google search engine
Google search engine

तालुक्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

रक्तदानाविषयी अनेकांच्या मनात भीती असल्यामुळे ते रक्तदान करणे टाळतात. परंतु ही भीती आता कमी होत असल्याचे दिसत आहे. कारण नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तर्फे बुधवारी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात रेकॉर्डब्रेक तब्बल २२३ बॉटल रक्तसंकलीत झाले. हा आकडा चांदूर रेल्वे शहरात प्रथमच पार झाल्याचे समजते.

    मागील पाच वर्षापासून नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चांदूर रेल्वे स्टेशन परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. त्यामुळे हिच परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत चांदूर रेल्वे स्टेशन परिसरात केले होते. या शिबीराला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे मंडल सचिव हबीब खान, कोषाध्यक्ष नरेंद्र दानफुले यांनी भेट दिली. या शिबीरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालय, महिला महाविद्यालय यांसह शहरातील विविध संघटना, युनियनचे सदस्य, शहरवासी यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविल्यामुळे २२३ बॉटल रक्तसंकलीत झाले. या शिबीरामध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला शहरातील सि. सि. एन. केबल नेटवर्क, भारतीय जैन संघटना व तिवारी दुध डेअरी यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांसाठी जेवनाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली होती. रक्तसंकलनासाठी नागपुर येथील जिवन ज्योती ब्लड बँकेची चमु आली होती. शिबीराच्या यशस्वीतेकरीता संघटनेचे शाखा अध्यक्ष विक्रमसिंह शेखावत, सचिव देवेश बाजपयी, कोषाध्यक्ष अजय दुबे,  एसीसी डेलिगेट अनिल भटकर तसेच शाखेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी, युनियन सदस्यांनी रक्तदान करून या मानव सेवेत आपले योगदान दिल्याबद्दल नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.