दोन चिमुकल्यासह आईची रेल्वेखाली आत्महत्या –  चांदूर येथील रेल्वे क्रॉसींगवरील घटना

0
665
Google search engine
Google search engine

पहाटे मालगाडीसमोर केली आत्महत्या

चांदूर रेल्वेः-
दारूड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका सत्ताविस वर्षीय महिलेने दोन चिमुकल्यांसह मालगाडी समोर आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज (ता.१२) पहाटे अडीच वाजता चांदूर येथील रेल्वे क्रॉसींगजवळ घडली. सौ दुर्गा शेखर रामटेके (वय२७), चि.प्रेम (वय १) कु.पियु (वय ५) असे त्या दुर्दैवी आई व दोन चिमुकल्यांची नावे आहे.
सविस्तर वृत्त असे की, चांदूर रेल्वे येथील भीमनगर येथील रहिवाशी असलेले शेखर रामटेके व सौ.दुर्गा शेखर रामटेके असे कुटूंब राहत होते.या दोघांचा प्रेमविवाह झाला होता.त्यांना अनुक्रमे एक व तीन वर्षाचे दोन मुलगे व पाच वर्षाची मुलगी आहे.शेखर हा बांधकामवर लोहा बांधण्याचे काम करीत होता.त्याला दारूचे व्यसन असल्याने तो सतत पत्नीला पैशासाठी त्रास देत होता.आठ दिवसापूर्वी रामटेके कुटूंब पुणे येथून आले होते. पती शेखरचा पत्नी दुर्गा ला दारू साठी सतत त्रास देत होता. त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत होती.अशातच काल रात्री कडाक्याचे भांडण झाले आणि दोघेही कुटूंबासह रेल्वे खाली जीव द्यायला गेले. पूढे शेखर तीन वर्षाचा मुलासह तर पत्नी दुर्गा एक वर्षाचा प्रेम व पाच वर्षाची पियु ला सोबत घेतले.शेखर मात्र रेल्वे ट्रॅक पर्यंत पोहचलाच नाही. त्यामूळे तीन वर्षाचा मुलासह शेखर बचावला. तर दुर्गाने मात्र मुले पळून जावू नये म्हणून दोघांनाही कमरेला बांधून घेतले होते. दारूच्या व्यसनापायी एका संसाराची राखरांगोळी झाली असून आईसह दोन चिमुरड्यांना जीवास मुकावे लागले. या घटनेमूळे समाजमन सुन्न झाले आहे.