भक्ती हे असे धन आहे जे कुणी चोरू शकत नाही – गोभक्त राधाकृष्णजी महाराज

0
1076
Google search engine
Google search engine

आकोट/प्रतीनिधी

ज्यांच्या मनात भगवान विराजमान आहे तो सर्व सुखी आहे भक्ती असे दान आहे जे कुणालाच गरीब ठेवत नाही आणि भक्तीची श्रीमंती ही कोणी कधीच चोरू पण शकत नाही म्हणून सत्त्वगुण प्रभावी योगीराज श्री संत गजानन महाराजांची भक्ती मंगलदाई ठरते आणि त्याची प्रचिती सत्त्वगुणी अमृत गुणी सत्त्वगुणी असणाऱ्या शांतीवन अमृतिर्थावर मिळते असा उपदेश जोधपुर राजस्थान येथील राधाकृष्णजी महाराज यांनी केला.

ते प्रकट दिन महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा प्रवचनाचे प्रथम पुष्प गुंफताना संत गजानन महाराज संस्थान शांतीवन अमृततिर्थ येथे बोलत होते.आपल्या प्रवचनात पुढे बोलताना ते म्हणाले वड पिंपळ वृक्ष नसून देवतत्व जपणारे वृक्ष आहेत या परिसरात मोठ्या संख्येने असणारे हे वृक्ष या परिसरात असणार ब्रह्मतत्त्वाचे दर्शन घडवते त्यामुळे या पवित्र भूमीला माझाही नमस्कार

पलाश वृक्षाच्या पानाला शास्त्रात सुवर्ण पत्रांचा मान आहे या पानावर भोजनदान ग्रहण करणे म्हणजे स्वर्ण पात्रत भोजन ग्रहण करणे एवढे महत्त्व आहे संत गजानन महाराज यांनी अन्न देवतेचा परमोच्च आदर केला त्यामुळे आज या संतांच्या नावाने आजही कित्येकांना भोजन लाभ मिळतोय संत गजानन ब्रह्मज्ञानी योगज्ञानी होते त्यांचे सत्त्वगुणाने हे आज या परिसरात भक्तीधारा ही मंगलधारा झाली आहे कथेचे मुख्य यजमान कैलाश चंद्र अग्रवाल अग्रवाल व कुमुदीनी अग्रवाल यांच्या हस्ते भगवत गीता तथा राधाकृष्ण महाराज यांचे पूजन करण्यात आले.

समारोप प्रसंगी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर भागवत कथा आरती व श्रीच्या आरतीने प्रथम पुष्प पार पडल्यानंतर दैनंदिन उत्सवामध्ये हरिपाठ संकीर्तन पार पडले यावेळी सौ जयश्री ताई पारसकर,राहेर यांचे हरिकिर्तन पार पडले.

कथा पर्वणीचे यंदा २१ वे वर्षशांतीवन अमृतिर्थावर श्रींच्या प्रगटदिन महोत्सवानिमित्य आयोजित होणाऱ्या

कथा पर्वणीचे यंदा २१वे वर्ष आहे.

भाविकांना दरवर्षी प्रख्यात कथा वाचकांच्या कथेची अध्यात्म पर्वणी लाभणाऱ्या या उत्सवाची पहिली कथा 1997 मध्ये हभप भुस्कट महाराज यांच्या मधुर वाणीने झाली होती साधारण ७० भाविकांवर सुरू झालेला कथा सप्ताह प्रगटदिन महोत्सव आता सात दिवसात सुमारे 70 हजार भाविकांपर्यंत पोहचला आहे.