नवीन तहसीलदार यांना असणार अवैध वाळू तस्करी रोखनचे आव्हान उमेश खोडके चांदुर बाजार चे नवीन तहसीलदार

374
जाहिरात

नवीन तहसीलदार यांना असणार अवैध वाळू तस्करी रोखनचे आव्हान
उमेश खोडके चांदुर बाजार चे नवीन तहसीलदार
चांदुर बाजार:-
पावसाअभावी चांदुर बाजार तालुक्यातील पूर्णा, मेघा, चारगड या प्रमुख नद्या काही महिन्यांपासून आटला आहे. त्यामुळे शहरातील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार असली तरी वाळू माफियांसाठी मात्र कोरद्या नद्या या नंदनवन ठरला आहे. कोरड्या नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे. या तस्करीकडे संबधित प्रशासन अर्थपूर्णपणे डोळेझाक करत आहे.

तालुक्यातील 28 वाळू घाट मधून रोज मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून चोरट्या मार्गाने विकला जात आहे .नदीतून वाळू उपशाचे कोणतेही टेंडर महसूल प्रशासनाकडून निघत नाही. नदी आटल्यानंतर या नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात येत आहे.मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात आला आहे. सुरुवातीला तालुक्यात दिवसाला 40 ते 50 ट्रॅक्टर वाळू या तालुक्यातील नदी पात्रातून दररोज घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंतर वाळू उपसा कमी झाल्यानंतर ही संख्या २५ ट्रॅक्टरवर आली आहे. ही वाळू स्थानिक असल्याने एका ट्रॅक्टरमागे तीन ते चार हजार रुपये मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या बदली नंतर चांदुर बाजार तहसील ला जवळपास 3 तहसीलदार याची बदली झाली मध्यतरी काळात जवळपास दीड महिना हा प्रभारी चार्ज म्हणून नायब तहसिलदार नीलिमा मते याच्या कडे होता.मात्र त्या काही वाळू तस्करी वर प्रभाव टाकू शकल्या नाहीत.नवीन आलेले तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळ मध्ये जवळपास 15 ट्रेकटर वर कार्यवाही केली.तरी मात्र अवैध वाळू तस्करी वर त्यांनाही आळा घालता आला नाही.दरम्यान उमेश खोडके हे नवीन तहसीलदार येणार असल्याने त्यांच्या समोर अवैध वाळू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

पोलीस विभाग सुद्धा काहीच कार्यवाही करत नसल्याने त्याचे वाळू तस्करी करणाऱ्या सोबत संगनमत तर नाही अशी चर्चा आता रंगू लागली आहे.दरम्यान या सर्वांवर ना महसूल विभाग ना पोलीस विभागाच्या वचक नसल्याचे होणाऱ्या वाळू तस्करी वरून दिसून येते.चांदुर बाजार ,शिरजगाव कसबा, आसेगाव आणि ब्राम्हण वाडा हे चार पोलीस स्टेशन येतात मात्र याच्या कार्यवाही न होत असल्याने वाळू तस्करी जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया:-
होणाऱ्या अवैध वाळू तस्करी वर अंकुश लावण्यासाठी आम्ही आमची टीम तयार केली आहे.लवकरच आम्ही या सर्वांवर कार्यवाही करू. यासाठी महसूल विभागाच्या सहकार्य असणे आवश्यक आहे.
अजय आकरे ठाणेदार चांदूर बाजार

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।