उस्मानाबादेत शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना गटबाजीचे ग्रहण ?

0
1231
Google search engine
Google search engine

उस्मानाबादेत शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना गटबाजीचे ग्रहण ?

उस्मानाबाद – युतीची घोषणा होताच उस्मानाबादच्या विद्यमान खासदारांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन स्वतःच्या प्रचाराचा नारळही फोडला . पदाधिकार्यांच्या गैरहजेरीत नारळ फोडल्यामुळे पदाधिकार्यात उलटसुलट चर्चा चांगलीच रंगली आहे. आधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापुर्वीच फोडलेला नारळ कसा निघणार ? असा सवाल उपस्थीत होत आहे . विद्यमान खासदार कंबर बांधून मैदानात उतरल्याचे दिसत आहे.मात्र
उस्मानाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो .या बालेकिल्याला गटबाजीचे गृहण लागले आहे. विद्यमान खासदारांना अनेक शिवसैनिकांचा आतून विरोध असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.भाजपा -सेना युती होण्यापुर्वी शिवसेनेने स्वबळाचा नारा देत तयारी सुरु केली होती .त्यावेळी सोशल मिडीयावर शिवसेनेने विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुखांनी केल्याची चर्चाही सोशल मिडियावर सुरु होती.युती होणार नाही म्हणत आखेर युती झाली . युतीत उस्मानाबाद ची जागा शिवसेनेकडेच राहणार का भाजपा लढवणार हे आजून पक्के नसताना मनानेच खासदारांनी स्वतःच प्रचाराचा तुळजापुर येथे नारळ फोडला असल्याची चर्चा सुरु आहे.गेल्या पाच वर्षात प्रा.रविंद्र गायकवाड यांनी मतदारसंघात अपुरा वेळ दिल्यामुळे मतदारात नाराजीचा सुर दिसत आहे. आम्ही प्रचार कसा करायचा आसा प्रश्न काही शिवसैनीक उपस्थीत करत आहेत . शिवसेनेकडून आधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी अनेकजन निवडनुकीची तयारी करतात माञ प्रचाराचा शुभारंभ उमेदवारी जाहीर झाल्यावरच किंवा अपक्ष अर्ज दाखाल केल्यावर केला जातो .विद्यमान खासदारांनी माञ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांना विश्वासात न घेताच नारळ फोडला त्यामुळे त्यांनी निवडणुकीसाठी कंबर बांधल्याचे बोलले जात आहे.जर पक्षाने उमेदवारी नाही दिली तर प्रा रविंद्र गायकवाड अपक्ष निवडणुक लढवणार का ? असा सवाल नागरीकातून उपस्थीत केला जात आहे.विद्यमान खासदारांच्या उमेदवारीला घटबाजीचे लागलेल्या ग्रहणाकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.