चांदूर रेल्वे पोलीसांनी शेतशिवारात ४६ हजारांचा पकडला जुगार – ठाणेदार शेळकेंच्या नेतृत्वात कारवाई ६ आरोपींना घटनास्थळावरून अटक

256
जाहिरात
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वे शहरालगत असलेल्या शेतशिवारात ठाणेदार ब्रम्हा शेळकेंच्या नेतृत्वात धाड टाकुन ४६ हजारांचा जुगार पकडल्याची घटना गुरूवारी (ता. २८) सायंकाळी ५.३० वाजता घडली.
प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वे – पळसखेड मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेल्या बंडू वाढोणकर यांच्या शेतात मोठा जुगार सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीवरून ठाणेदार ब्रम्हा शेळके यांनी स्वत: धाड टाकुन दोन कॅट व ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळावरून आरोपी बंडू विकास वाढोणकर (४८), विनोद मधुकर नागमोते (५०), उमेश गोविंदराव चौधरी (५०), शरद बळीराम खोब्रागडे (३८), राजीक गफ्फार शेख (३२), शेख जफर शेख सत्तार (४०) रा. सर्व चांदूर रेल्वे या ६ आरोपींना अटक केली. अटक सर्व आरोपींविरूध्द जुगार अॅक्ट १२ (अ)  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।