मेटेंना अल्टीमेटम

0
850
Google search engine
Google search engine

पंकजा मुंडेंचा होता आक्षेप ?

पंकजा मुंडे यांच्या कडक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांना मेटेंना अल्टीमेटम द्यावा लागला.

बीड : निवडणुकीत राज्यात शिवसंग्राम भाजपसोबत असेल परंतू बीड जिल्ह्यात नाही असे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दोन दिवसापूर्वी स्पष्ट केले होते.परंतू राज्यात एक आणि जिल्ह्यात एक भूमिका चालणार नाही. मेटेंना जिल्ह्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे.

बीडमध्ये पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वैर सर्वांना माहिती आहे. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम मेटेंना साथ दिली. पंकजा मुंडे यांच्या प्रखर विरोधामुळे विनायक मेटे यांना मंत्रिपद मिळाले नाही. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले काही महामंडळाचे अध्यक्षपद आणि विविध महामंडळांवर प्रतिनिधित्व दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद देण्याचा शब्द पाळला नसला, तरी महामंडळावर योग्य प्रतिनिधित्व देऊन सन्मान केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसंग्राम भाजपसोबतच असेल मात्र जिल्ह्यात नाही, असे विधान मेटे यांनी शुक्रवारी केले होते. त्यामुळे विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादाचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेत मेटेंना औरंगाबाद येथील जाहीर सभेतून अल्टीमेटम दिला आहे.  परंतु मेंटेच्या या भूमिकी मुळे मग जिल्ह्यात भाजपला असहकार्य करण्याच्या मेटेंच्या भूमिकेवर आक्षेप घेत पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती अशी सूत्रांची माहिती आहे. बीड मध्ये मित्रपक्ष भाजपला सहकार्य करणार नसेल तर मग मी इतर जिल्ह्यात प्रचाराला कधी आणि कसे जायचे असा सवाल मुंडे यांनी केला होता.