आरटीई अंतर्गत चांदूर रेल्वे येथे एक दिवसीय शिबीर संपन्न  >< विनामुल्य भरून देण्यात आले आरटीई फॉर्म बार्टीचे आयोजन

0
605
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहजाद खान.)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) याच्या विशेष कक्ष बालकाचा शिक्षण अधिकार कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात समता दूत प्रकल्पाच्या माध्यमातून शिबीराचे आयोजन होत आहे. अशातच महासंचालक कैलाश कणसे, मुख्य संचालिका प्रज्ञा वाघमारे, राहुल कराळे, प्रकल्प अधिकारी विजय वानखेडे याच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे तालुक्यात समता दूत सलीम खान खलील खान पठाण यांनी चांदूर रेल्वे तालुक्यात नुकतेच एक दिवसीय आरटीई शिबिराचे यशस्वी आयोजन केले. सदर आयोजन समता विचार संघ चांदूर रेल्वे च्या सहकार्याने घडून आणले. या शिबिरासाठी निकिता पवार (समता दूत), सीमा शेवाने (समता दूत यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात सहभागी गरजू विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश फॉर्म विनामुल्य भरून देण्यात आले. हे शिबीर दोन सत्रात घेण्यात आले. सकाळच्या सत्रात समता विचार संगठन, चांदूर रेल्वे यांच्या कार्यालयात व दुपारच्या सत्रात मिलिंद नगर येथील विहारात घेण्यात आले. या शिबिराला ग्रामीण भागातील लोकानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अशा शिबिरांची गरज असल्याचे मत यावेळी भास्कर बनसोड, अध्यक्ष समता विचार संगठन यांनी व्यक्त केले. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी भोजराज सोनोने, बनसोड सोनोने, समता दूत (अमरावती) सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व महिला, नागरिकांनी सहकार्य केले.