कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

Google search engine
Google search engine

सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या क्रमांक 22, कलम 36 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना अधिकार प्रदान केले आहेत.
यानुसार सडकांवरील व सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व त्यांची वर्तणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही सडकेवरून किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा वेळी अडथळा होवू न देणे, मिरवणूका ज्या मार्गाने जाव्यात अथवा जावू नयेत, त्यांची वेळ व मार्ग ठरवून देणे, सार्वजनिक सडकांवर व सडकेमध्ये घाटात किंवा घाटावर मार्ग असल्यास किंवा धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक लोकांच्या स्नानाच्या ठिकाणी, जागेमध्ये, जत्रा, देवालय, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जाण्या येणाच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणे, कोणत्याही सडकेत किंवा सडकेजवळ, सार्वजनिक जागेत वाद्य वाजविणे किंवा ढोल, ताशे, इतर वाद्ये वाजविणे यांचे नियमन करणे, कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी पोलीस अधिनियमाचे कलम 33, 36, 37 ते 40, 42, 43 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या अधिन असलेल्या व त्यास पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढणे, असे अधिकार प्रदान केले आहेत. हा आदेश दिनांक 27 मार्च 2019 रोजीच्या 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 25 एप्रिल 2019 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.
या दरम्यान संपूर्ण पोलीस ठाणे स्थलसिमा हद्दीत कोणालाही मोर्चे, निदर्शने, मिरवणुका, सभा इत्यादी आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी संबधीत पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, सभेचे ठिकाण इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेतली पाहिजे. या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
00000