बीड काँग्रेसच्या दादासाहेब मुंडे यांना मारहाण

0
1666
Google search engine
Google search engine

बीड लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला म्हणुन दादासाहेब मुंडे या कॉंग्रेस कार्यकर्त्यास आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.

दादासाहेब मुंडे यांना उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणुन झालेल्या मारहाणीची घटना अतिशय गंभीर आहे, या संदर्भात आपण निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, मारहाण करणार्‍या गुंडांना तातडीने अटक करा, संपुर्ण निवडणुक प्रक्रिया होईपर्यंत त्यांना तडीपार करा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.