चांदूर रेलेवेत स्थिर निरीक्षण पथकाने जप्त केले १८ लाखांचे सोने – कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सोने केले परत

0
669
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
चांदूर रेल्वेत स्थिर निरीक्षण पथकाने जप्त गुरूवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता एका कारमधून अंदाजे १८ लाखांचे सोने जप्त केले होते. या सोन्याच्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर जप्त केलेले सोने परत करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असतांना आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी निवडणुक विभाग खबरदारी घेत आहे. चांदूर रेल्वे शहरातील सिटी पॉईंट येथे मंडल अधिकारी अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात तलाठी सराड, धोटे, भांगे, रवि मानवटकर, पोलीस कर्मचारी शरद खेडकर यांच्या स्थिर निरीक्षण पथक (एसएसटी) व्दारे वाहने तपासणी करतांना गुरूवारी स्वीप्ट डिझायर क्र. एमएच १२ पी.टी. ८०८४ या वाहनातुन राहुल शशिकांत शिवखेरी रा. इंदिरा नगर, स्वस्तीक अपार्टमेंट, नाशिक यांच्याकडून ५९८ ग्रॅम सोने अंदाजे किंमत १८ लाख रूपये जप्त करण्यात आले होते. सदर सोने पी.एन. गाडगीळ सन्स लि. पुणे येथुन पी.एन. गाडगीळ सन्स लि. वर्धा शाखेमध्ये नेत असल्याचे राहुल शिवखेरी यांनी सांगितले व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता सुध्दा केली. पोलीसांनी सुध्दा पुणे येथील गाडगीळ यांच्या शाखेत संपर्क साधून खात्री केली. यानंतर सदर सोने राहुल शिवखेरी यांना परत करण्यात आले. सदर सोने कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर सुटले असले तरी यावरून मात्र स्थिर निरीक्षण पथकाचे कार्य निदर्शनास आले आहे.
Photo – File