हिंदूंनो, धर्मविरोधी भूलथापांना बळी पडू नका धर्मशास्त्र समजून घेऊन गुढीपाडवा साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती

0
695
Google search engine
Google search engine
गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुद्ध प्रतिपदा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ केला म्हणून हा दिवस नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो. २०१९ या वर्षीच्या गुढीपाडव्याला हिंदु कालगणनेनुसार सृष्टीच्या निर्मिती होऊन १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२१ व्या वर्षाचा आरंभ होत आहे. कुठे जेमतेम २००० वर्ष पूर्ण होत असलेल्या इतर कालगणना आणि कुठे हिंदूंची श्रेष्ठ अशी अगाध कालगणना ! यांची तुलना होऊ शकत नाही. वेदांमध्ये ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ म्हणजे १२ मासांचे एक वर्ष असावे, असे म्हटले आहे. याच हिंदु कालगणनेनुसार वर्षारंभदिवस म्हणजे ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ ! चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. अशी १ जानेवारी यादिवशी वर्षारंभ करण्याचा काही इतिहास नाही. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकीही एक आहे. त्यामुळे यादिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसाची कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते, असे हिंदु धर्म शास्त्र सांगते. त्यामुळे हिंदूंनी आपल्या गौरवशाली परंपरेविषयी कृतज्ञता व्यक्त करत, धार्मिक परंपरांचे आचरण करत नववर्षारंभ करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
धर्मविरोधी प्रचाराला भुलू नका !
*अ.* काही धर्मविरोधी मंडळी जाणीवपूर्वक ‘छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचे शीर भाल्याला लावून फिरवले, यानिमित्त ब्राह्मणांनी गुढीपाडवा चालू केला’, असा जातीयवादी आणि अत्यंत खोटारडा प्रचार करून समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंना कुठेही धर्माचे शिक्षण मिळत नसल्याने दुर्दैवाने काही हिंदु बांधव या अपप्रचाराला बळीही पडत आहेत. त्यांनी पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
  १. सहस्रो वर्षांपूर्वीच्या महाभारतातील आदिपर्वात श्‍लोक १८ ते २२ मध्ये गुढी उभारण्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
  २. ‘अधोर्ध्व गुढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥ संकल्पविकल्पांचे लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥’ असे संत ज्ञानेश्‍वरांनी ११ व्या शतकांत लिहलेल्या ओव्यांत म्हटले आहे.
  ३. ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची ।’ असे १४ व्या शतकात संत चोखामेळा म्हणतात.
   असे अनेक संदर्भ आज उपलब्ध आहेत. हे लक्षात घेता ३५० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर गुढीपाडवा चालू झाला, हा प्रचार धादांत खोटा आहे, हे सिद्ध होते.
*आ.* गेली काही वर्षे या अपप्रचाराला हिंदु भुलले नाहीत, म्हणून आता ‘गुढीच्या जागी भगवा ध्वज उभारा’ असा नवा अपप्रचार चालू झाला आहे. भगवा ध्वज गुढीपाडव्यालाच नव्हे, तर ३६५ दिवस हिंदूंनी आपल्या घरावर लावायला हवा; मात्र गुढीच्या जागी भगवा ध्वज लावा, हा प्रकार ‘गुढीपाडवा’ बंद करण्याचेच कारस्थान आहे. त्यामुळे ‘गुढी उभारा, त्यासोबत वर्षभर भगवाध्वज घरावर लावा’, असे समितीने म्हटले आहे.
*इ.* गुढीच्या संदर्भातील धार्मिक कृत्यांबाबतही अपप्रचार केला जातो. उदा. तांब्या उलटा ठेवणे अशुभ असते, साडी टांगणे म्हणजे अब्रू टांगणे आदी. मुळात ज्यांना हिंदूंच्या धार्मिक परंपरा मान्य नाहीत, धार्मिक विधींनाच विरोध आहे, अशांनी ‘शुभ-अशुभ’ यांविषयी बोलणे हाच मोठा विनोद आहे.
  हिंदूंनो, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता धर्मपरंपरांचे श्रद्धापूर्वक पालन करावे, असे समितीने म्हटले आहे.
विविधतेने नटलेल्या भारतात विविध नावांनी साजरा केला जातो ‘गुढीपाडवा’ !
महाराष्ट्रात गुढीपाडवा नावाने, तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात ‘उगादी’, आसाममध्ये ‘बीहू’, मणिपुरमध्ये ‘चेईरावबा’, गुजरातमध्ये ‘बस्तु वरस’, उत्तर प्रदेशमध्ये ‘चैत्रप्रतिपदा’, तर पंजाबमध्ये ‘बैसाखी’ नावाने साजरा हा सण साजरा होतो. हिंदूंनो, गुढीपाडव्याविषयी या जातीद्वेषमूलक प्रसारालाही दाद लागू न देता ‘हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करा ! धर्मशास्त्र समजून घेऊन धर्माचरण करा. हिंदु सण-उत्सव मोठ्या उत्साहात अन् आनंदात साजरे करा’ असे आवाहन समितीने केले आहे.
याविषयी अधिक माहितीसाठी https://www.sanatan.org/mr/gudipadwa भेट द्या.