प.वि.पाटील विद्यालयात उभारली मतदानाची गुढी

0
830
Google search engine
Google search engine

जळगाव :-
‘करून संकल्प मतदानाचा सण करू साजरा गुढी पाडव्याचा’ या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात गुढी पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकी साठी सर्व मतदातांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपली लोकशाही बळकट करावी यासाठी गुढी सोबत मतदान जनजागृती करत विविध प्रकारचे घोषवाक्य लिहून व घोषणा देऊन सण साजरा करण्यात आला.
‘ मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा ‘ , ‘मतदानाचा अभिमान हीच लोकशाहीची शान’, ‘वृद्ध असो किंवा जवान सर्व जण करा अवश्य मतदान ‘ , ‘वोट हमरा है अधीकार ,नही करेंगे इसको बेकार ‘ ,’ लालच देकर वोट जो मांगे ,भ्रष्टाचार करेंगा आगे ‘ , ‘ ना नशेसे ना नोट से , किस्मत बदलेगी वोट से ‘ अशा घोषवाक्यांनी मतदार जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर यशस्वीतेसाठी उपशिक्षिका सरला पाटील , कल्पना तायडे , दीपाली चौधरी , सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.