नरखेड तालुक्यात ७३ गावात वॉटर कप स्पर्धेला मध्यरात्री पासून सुरुवात !  रात्री १२ वाजता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या गावांना भेटी !  नरखेड तालुक्यात तुफान आलंया..

0
1386
Google search engine
Google search engine

नरखेड तालुक्यात ७३ गावात वॉटर कप स्पर्धेला मध्यरात्री पासून सुरुवात !

रात्री १२ वाजता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या गावांना भेटी !
नरखेड तालुक्यात तुफान आलंया..

विशेष प्रतिनिधी /

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात २५ गावात वॉटर कप स्पर्धेला ७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता मध्यरात्री पासून सुरुवात झाली . नरखेड तालुक्यात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन कसे करावे याचे शिक्षण सुरू झाले.महाराष्ट्र सगळा या अभिनव उपक्रमाचा साक्षीदार होण्यासाठी प्रयत्न करू लागला.आपलं गाव पाणीदार व्हावं,आपल्या परिसरातील पाणी आपल्याच भागात मुराव,वाहणाऱ्या पाण्याचं आणि मातीच नियोजन करून ते आडवण्याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे तरुण महाराष्ट्रात आज तुफान मनात घेऊन गावोगावी काम करू लागली आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील ७३ गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे .

यावेळी गावकऱ्यांनी स्पर्धेची सुरुवात ७ तारखेला मध्यरात्रीच्या १२ वाजता केली असून गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व श्रमदान करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार , गट विकास अधिकारी दयाराम राठोड , सहायक गट विकास अधिकारी चेतन हिवंज , नेहारे , गुंजरकर , पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक भूषण कडू , नागपूर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी , सर्व कर्मचारी संघटना , पानी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी , नयन गावंडे , सुभाष देठे , प्रज्वल टापरे , अजय पचारे , शेषराव राठोड , सरोज उपसे , पूजा वानखडे , यांच्यासह पाणी फाउंडेशन टीम यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करून , श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढविला .

या गावांमध्ये आपले गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी ग्रामस्थ सामुहिक श्रमदान करत आहेत. भविष्यात दुष्काळामुळे गेल्या चार वर्षात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे मात्र पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन गावकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धारच केला आहे. यासाठी गावकरी रात्रिचा दिवस करून श्रमदानाचे काम करत आहेत. या स्पर्धेमुळे गावकऱ्यांनी जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गावच्या मातीत लहान, थोर हात राबत आहेत. या स्पर्धेचे विजेते पद पटकीवण्याचा नरखेड तालुक्यातील गावांनी जणु निश्चयच केला आहे.

नरखेड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता नेहमीच जाणवते मात्र पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेमुळे जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणात उभी राहतील आणि पाण्याची पातळी निश्चित वाढणार आहे. ही स्पर्धा आता लोकचळवळ होत आहे. सरकार आणि सेवाभावी संघटनांचा मदतीचा हात यामुळे गाव पाणीदार करण्याच्या या मोहिमेला आणखी गती मिळत आहे. नरखेड तालुक्यातील गावातील सर्वच ग्रामस्थांनी भर उन्हात सोमवारी या योजनेत सहभाग घेऊन माथ्यापासुन ते पायथ्यापर्यंत श्रमदानास सुरवात केली आहे. नरखेड तालुक्यातील गावकरी सकाळी सहा वाजल्यापासुन गावकरी टिकाव, खोरी घेऊन गाव पाणीदार करण्यासाठी घरातुन बाहेर पडले.
आपले दोन हात असले की कोणत्याही मशीनची गरज लागत याची प्रचिती गावकऱ्यांनी आली असल्याचे अनुभवाला मिळाले .

आठ तारखेला मध्यरात्री बारा वाजल्या पासून कामाला सुरुवात झाली आहे . आठ ८ एप्रिल ते २२ मे हा कालावधी ठेवण्यात आला आहे . अशीच सुरुवात नरखेड तालुक्यातील ७३ गावात सुरू झाली आहे … प्रत्येक गावात वाजतगाजत , सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आतिषबाजी करत कामाला सुरुवात झाली आहे तर कुठे मशालफेरी काढून कामाला सुरुवात करण्यात आली आहे . पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक खेड्यातून लोकजागर घुमू लागलाय, अनेक गावांनी पाण्यासाठी तरुणांची फळी उभा केली आहे.प्रशिक्षित तरुणांची फळी उत्स्फूर्तपणे या चळवळीला गती देत आहे,प्रशासन मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे.आज गावोगावी ,टिकास , पावडे , टोपल्यांची चर्चा सुरू झालीय,रोपवाटिका सज्ज होताना दिसत आहेत,शोषखड्डे गावकरी स्वतः सहभाग घेऊन खोदताना दिसत आहेत.शिवारफेरी,माती परीक्षण,अनेक उपचार पद्धती,पाणी बचतीच तंत्रज्ञान शिकवलं जातंय.सीसीटी,डीप सीसीटी,कंपार्टमेंट बंडीग,कंटुर बंडीग,इन लेट,आऊट लेट शेततळे,छोटे मातीचे धरण, अनघड दगडी बांध,गबियन बंधारा,सिमेंट बंधारा, नाला रुंदीकरण ,खोलीकरण,पाणीसाठ्यातील गाळ काढणे आदी कामाना येत्या महिनाभरात गती मिळणार आहे.

या गावांनी रात्री १२ वाजता केली श्रमदानाला सुरुवात !

राणवाडी , खरसोली , आरंभी , पिंपळदरा , खलानगोंदी , बरड पवनी , रामठी , उदापुर , खेडी खुर्द , मालापूर , मन्नाथ खेडी , सारडी , गोंडेगाव , गायमुख , खैरगाव , एरंडा , दातेवाडी , तारा , पिंपळा के , पिंपळगाव , कारांजोली , या गावांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार , गट विकास अधिकारी दयाराम राठोड , जिल्हा समन्वयक भूषण कडू यांनी गावाला भेटी देऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले .