डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘ एक वही एक पेन ‘ प्रकल्प – प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयाचा अभिनव उपक्रम

0
1088
Google search engine
Google search engine

जळगाव:-

समाजातील वंचित शोषित घटकांसाठी शिक्षणाचे दार उघडून देणारे व स्त्री शिक्षणाचे उद्गाते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती तसेच केसीई सोसायटी वर्धापन वर्षानिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ एक वही एक पेन’ अशा अभिनय उपक्रमाद्वारे जयंतीउत्सव साजरा करून महामानवांना अभिवाद करण्याचा संकल्प करण्यात आला.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वही , पेन ,पेन्सिल अशा विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर व्हाव्या या उद्दिष्टाने शाळेतील इच्छुक विद्यार्थ्यांकडून त्यांच्या परीने जे शक्य होईल ते शैक्षणिक साहित्य जमा करण्यात आले. सदर शैक्षणिक साहित्याचे वाटप विविध शाळांतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर करण्यात येणार आहे.

शाळेच्या या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थी ,पालक तसेच शिक्षण प्रेमी भरभरून प्रतिसाद देत असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील व मुख्या.डी. व्ही.चौधरी व पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.तर यशस्वितेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.