भरधाव वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने तीन ठार, सात जखमी

798

गडचिरोली/आलापल्ली:- आज दोन भरधाव वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने 3 जण जागीच ठार झाले तर 7 जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ घडली.
मृतांमध्ये एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. कोमा बंडू लेकामी(४३), झुरी दस्सा गावडे(७०) व चुक्को करपा आत्राम(७०) सर्व, रा. कोळसेपल्ली, अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात मासा पेंटा तलांडी(४५), ढोबी केसा आत्राम(७०), चिना इरपातलांडी(७०), बाबाजी गोंगले(७०),सर्व रा. कोळसेपल्ली व पोचा जोगी तलांडी(५५)रा.पालेकसा हे जखमी झाले आहेत.

जाहिरात
Previous articleTik Tok हूवा इंडिया मे बॅन – This Item isn’t available in your Country – अब नही होगा डाउनलोड
Next articleजिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३५७० जागा (मुदतवाढ)