आरटीईमध्ये चांदूर रेल्वे शहरातील ४९ विद्यार्थ्यांना लागली लॉटरी – पालकांच्या मोबाईलवर मॅसेज

0
606
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची भरपाई शाळांना शासनाकडून देण्यात येते. याच आरटीई अंतर्गत पुणे येथे नुकत्याच झालेल्या सोडतीमध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील ४९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असुन याबाबत पालकांना नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर मॅसेज पाठविण्यात आला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठी चांदूर रेल्वे शहरातील नोंदणी असलेल्या जिंगल बेल इंग्लीश स्कुल, लिटील स्टार इंग्लीश स्कुल व राजर्षी स्कुलमध्ये अनेक पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केला होता. घर ते शाळा दरम्यान कमी अंतर असलेल्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील शहरातील ४९ विद्यार्थ्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ११ एप्रील ते २६ एप्रील दरम्यान होत आहे.
लॉटरी पध्दतीने ज्यांच्या पाल्याची निवड झाली आहे, त्यांनी गटसाधन केंद्रात जाऊन पडताळणी समिती मार्फत कागदपत्रांची पळताळणी करून घ्यावी. संबंधित कागदपत्रांची पुर्तता करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चीत करावा.
सदाशिव दाभाडे
गटशिक्षणाधिकारी, चांदूर रेल्वे