अमरावती जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचा कंत्राटी लेखापाल ACB च्या जाळ्यात

0
3901
Google search engine
Google search engine

अमरावती :- जिल्हापरिषद मधील आरोग्य विभागातील कंत्राटी पदावर काम करणारे श्री अमोल भगवंतराव ढोले, वय 31 वर्ष , पद फायनान्स मॅनेजमेंट ग्रुप,FMG, लेखापाल (कंत्राटी), आरोग्य विभाग जिल्हा परिषद, अमरावती. कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अमरावती यांंना 7000/- (सात हजार रुपये) लाच घेताना पकडण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की,

तक्रारदार व्यवस्थापक असलेले देविकर अक्वा, अमरावती यांचे कडून राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय अमरावती येथे सन 20016-17 पासून पुरविण्यात आलेल्या पाणी can चे बील काढून दिल्याबद्दल पुरविलेल्या पाणी can चे प्रती can 5/- रुपये प्रमाणे अमोल ढोले लेखापाल लाचेची मागणी करीत असल्या बाबत प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने पडताळणी दरम्यान अमोल ढोले यांनी तक्रारदाराने पुरविलेल्या 1400 can चे बील काढून दिल्याबद्दल प्रती can 5/- रुपये प्रमाणे एकूण 7000/- रूपये लाचेची मागणी केली व सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष 7000/- रुपये लाच स्वीकारली

कारवाई पथक मध्ये  पोलिस उप अधीक्षक श्री गजानन पडघन , पोहेकॉ चंद्रशेखर दहेकर, नापोशी सुनील वऱ्हाडे, पोशि अभय वाघ, महेंद्र साखरे, चा नापोशि चंद्रकांत जनबंधू..यांचा समावेश होता

आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे कोतवाली अमरावती येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे