चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीतुन २१ किलो तुर गेली चोरीला-शेतकरी अमोल आखरे यांची बाजार समिती सचिवांकडे तक्रार

0
960
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

    चांदूर रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधुन एका शेतकऱ्याची २१ किलो तुर चोरीला गेल्याची तक्रार बाजार समितीच्या सचिवाकडे केली आहे.

      चांदूर रेल्वे तालुक्यातील बसलापुर येथील शेतकरी अमोल अवधूतराव आखरे यांनी त्यांच्या शेतातील ६ क्विंटल ३५ किलो तूर चांदूर रेल्वे येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन महिण्यांपुर्वी विक्रीसाठी आणली होती. तेव्हा व्यापारी वर्गाने बोली बोलते वेळी हमीभावापेक्षा कमी किंमतीत मालाची खरेदी करण्याचे ठरविले होते. तेव्हा अमोल आखरे यांनी सरकारी हमीभाव ५६७५ रूपये असून सुद्धा व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुर ४६०० ते ४८०० या दरात खरेदी करीत असल्यामुळे व्यापारीला विचारणा केली असता त्यांची एका व्यापारासोबत बाचाबाची झाली व व्यापाऱ्यांनी उद्धटपणे बोलून तुमच्याकडून जे करायचे असेल ते करा असे उध्दटपणे बोलल्याचा आरोप अमोल आखरे यांनी केला होता. यानंतर त्यांनी चांदूर रेल्वे येथील व्यापाऱ्यांचा परवाना जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणामुळे सदर तुर बाजार समितीमध्येच होती. या  प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे शेतकरी अमोल आखरे यांनी तुर वापस नेण्याचे ठरविले असता व पहिले काटा करून बघितला असता तुर ६ क्विंटल १४ किलोचं भरली. म्हणजेच पुर्वीपेक्षा २१ किलो कमी भरल्याचा आरोप आखरे यांनी केला. त्यामुळे अमोल आखरे यांनी याबाबातची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सभापती यांच्याकडे देऊन चोरीच्या २१ किलो तुरीची भरपाई मागितली आहे. सदर तक्रारीवर विचार न केल्यास अमोल आखरे यांनी शेतकरी मित्रांसह उपोषणाला बसण्याचा इशारासुध्दा दिला आहे. तक्रार देतेवेळी अमोल आखरे यांच्यासह सुधाकर यावले, अंकुश बोबडे, गंगाधर वाघ, निलेश खडसे, मिलींद खडसे, मंगेश मोने, प्रदिप घाटोळ, अनिकेत आखरे, सुशांत झाडे, शुभम आखरे, निरज दुबे, दिनेश दुबे आदींची उपस्थिती होती.