सोनोरा (बु.) येथील युवकाचा उष्मघाताने मृत्यु – उष्मघाताचा चांदूर रेल्वे तालुक्यातील पहिला बळी

906

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

चांदूर रेल्वे तालुक्यासह जिल्हाभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात तापमान ४६ अंशावर पोहोचले आहे. वाढते तापमान सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. अशीच एक घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा (बु.) येथे घडली आहे. उष्मघाताने ४४ वर्षीय व्यक्तीचा रविवारी दुपारी ३.३० वाजता मृत्यु झाला आहे.

चांदूर रेल्वेवरून १० कि.मी. अंतरावरील सोनोरा (बु.) येथील सुरेश मनोहर खडसे (४४) हे काही कामानिमित्य रविवारी नांदगाव खंडेश्वर येथे गेले होते. परंतु तेथे दुपारी अचानक ते खाली कोसळले. त्यानंतर तेथील काही नागरीकांनी त्यांना ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. परंतु नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयात त्यांना दुपारी ३.३० वाजता मृत घोषीत करण्यात आले. नांदगाव वरून त्यांना सायंकाळी सोनोरा (बु.) गावी आणण्यात आले. व गावात रात्री त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, अविवाहीत २ मुले व २ मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. सुरेश खडसे हे बँक पथकात बँड वाजवुन घराचा उदरनिर्वाह चालवत आहे. घराचे आधारवड गेल्याने घरच्यांनी एकच आक्रोश केला होता. खडसे यांच्या अचानक मृत्युने गावात शोककळा पसरली आहे.

जाहिरात