प्रहारच्या आंदोलनमुळे अखेर येवदा येथील तलाठी कार्यालयातील विद्युत पूरवठा सुरळीत- अखेर केला विजदेयकाचा भरणा

0
1009
Google search engine
Google search engine

शेतकऱ्यांना तात्काळ कागदपत्रे देण्यात येतील तलाठी यांचे प्रतिपादन…

प्रतिनिधी / येवदा
येवदा गावातील बाजारातील ग्रामपंचायत शासकीय इमारतीत तलाठी,कृषि कार्यालये आहेत त्याठिकाणी तलाठी कार्यालयाने विद्युत पूरवठा घेतला परंतु गेल्या दिर्घ काळापासून विद्युत देयके थक्कीत असल्याने विद्युत पुरवठा महाराष्ट्र विद्युत वितरण कंपणीने खंडीत केला होता.त्यामुळे सामान्य ग्रामस्थ,शेतकऱ्यांना अॉनलाईन कामे तसेच इतर दाखले तसेच इतर सेवा सुविधा पासून येवदा गावातील जनतेला वंचित राहावे लागत होते या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर यांनी तलाठी कार्यालयात मागील आठवड्यात विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत तलाठी कार्यालयात ठीय्या आंदोलन केले वृत्त पत्रांची दखल व आंदोलनची तात्काळ दखल घेऊन मा तहसिलदार राहुल कुंभार यांनी आज सकाळी विद्युत देय्यकाची थक्कीत बाकी …..रुपये भरणा केली तसेच तालुक्यातील इतर गावातील तलाठी कार्यालयातील विद्युत देयके थक्कीत बाकी असल्याने विद्युत पूरवठा बंद असल्याबाबत प्रदिप वडतकर यांनी तालुक्यातील तलाठी कार्यालयातील विद्युत पुरवठा सुरूळीत करुन सेवा सुविधा पूरविण्याची मागणी तहसिलदार यांच्या कडे केली आहे ग्रामस्थ, शेतकऱ्यांना लागणारे दाखले, कागदपत्रे व इतर सेवा तात्काळ पुरविण्यात याव्या अन्यथा तहसिल कार्यालयात कोणत्याही क्षणी पुन्हा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुध्दा तहसिल विभागाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर यांनी दिला आहे..