चांदूर रेल्वे तालुक्यात ‘द बर्निंग टिप्पर’ समृध्दी महामार्गाच्या टिप्पर ला चालु इलेक्ट्रीक ताराचा स्पर्श – ट्रक जळुन खाक

0
1203
Google search engine
Google search engine
मांजरखेड (दानापुर) शेतशिवारातील घटना 
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेल्या समृध्दी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परला चालु इलेक्ट्रीक तारांचा स्पर्श झाल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड परिसरात समृध्दी महामार्गाचे काम दिवस रात्र सुरू आहे. अशातच घुईखेड शेतशिवारातुन गौणखनिज खोदून मांजरखेड (दानापुर) शेतशिवारातुन ट्रकने ने – आन करण्याचे काम सुरू आहे. अशातच शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान टाटा मोटर्स कंपनीचे एलटीडी / एलपीके २५१८ टीसी / ३८ या नावाचा टिप्पर क्र. आरजे १९ जीडी १४७० मुरूम खाली करून परत येत असतांना अचानक एलएनकेव्ही च्या वरील चालु तारांना टिप्परचा स्पर्श झाला. भर उन्हात स्पर्श झाल्याने टिप्परने थेट पेट घेतला. ट्रक चालक कालुराम याने कसा – बसा आपला जीव वाचविला. यामध्ये ट्रक काही मिनीटामध्येच जळुन खाक झाला. सदर ट्रक एनसीसी कंस्ट्रक्शनचा असुन राजस्थान राज्यातील आहे. सदर माहिती मिळताच गावकऱ्यांनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
इलेक्ट्रीक लाईन वर असतांना स्पर्श कसा ? 
सदर एलएनकेव्ही ओव्हरहेड लाईन वरून गेली असतांना याचा टिप्परला स्पर्श कसा झाला ? या मोठा प्रश्न निर्मान झाला आहे. काही नागरीकांच्या मते सदर टिप्पर चालक जेव्हा मुरूम खाली करण्यासाठी हायड्रॉलीक ट्रॉली वर उचलतात. परंतु खाली झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता व ट्रॉली खाली न करता टिप्पर सुसाट धावतात. अशाच प्रकारामुळे तर सदर प्रकरण घडले नाही ना ? याबाबत अनेक उलटसुलट तर्क लावण्यात येत होते.
अनेक कामगार अल्पवयीन 
सदर कामावर अनेक कामगार अल्पवयीन असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अशातच जळालेल्या टिप्परचा चालक नेमका कोण याबाबत शंका असुन संबंधित एजन्सीतर्फे पत्रकारांना या टिप्परच्या चालकाचे वय सांगणे टाळले. त्यामुळे नेमका या ट्रकचा चालक कोण व त्याचे वय किती याचा शोध पोलीसांना लावाला लागणार आहे.