लोहार्यात पैशे काढून घेतले तर उमरग्यात हातऊसने पैशाच्या कारणावरून मारहाण

262

लोहारा येथे बळजबरीने पैसे काढुन घेतले गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन लोहारा :- दिनांक 27.04.2019 रोजी 12.30 वा. सु. ककैय्या नगर लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद येथे 1) उदयराज भोसले 2) हणुमंत जाधव 3) इश्वर 4) एक अनोळखी इसम यांनी संगनमत करुन ओंकार नथुराम धुमाळ रा. मैत्राह वायु (वेदावती) प्रा. लि. हैद्राबाद रा. वारसोली ता. अलिबाग जि. रायगड ह. मु. ककैय्या नगर लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांचे लोहारा येथील ऑफिस मध्ये येवुन ओंकार नथुराम धुमाळ यांना दमदाटी करुन प्रत्येक पवन चक्कीला तु मला चार लाख रुपये द्यायचे आम्ही देवानंद रोचकरी यांचे लोक आहोत असे म्हणुन ओंकार धुमाळ यांना स्कॉर्पिओ जिप क्र एम एच 25 ए एल 3793 मध्ये बळजबरीने बसवुन तुला देवानंद रोचकरी यांचेकडे घेवुन जातो असे म्हणुन हिप्परगा मार्गे तुळजापुर कडे घेवुन गेले व तुळजापुर जवळ जिप थांबवुन ओंकार धुमाळ यांचे खिशातील वीस हजार रुपये मारहान करुन काढुन घेतले त्यानंतर तुळजापुर येथील एटीएम मधुन वीस हजार रुपये काढण्यास लावुन सदरचे वीस हजार रुपये बळजबरीने काढुन एकुण 40 हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले आहेत. म्हणुन ओंकार नथुराम धुमाळ यांचे फिर्यादवरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 03.05.2019 रोजी पोलीस स्टेशन लोहारा येथे भादंविचे कलम 394,384,363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरगा येथे हातउसने पैशाचे कारणावरुन मारहान गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन उमरगा :- दिनांक 01.05.2019 रोजी 09.30 वा. सु. डिग्गी रोड कारले प्लॉट उमरगा येथे 1) इमरान मुसा शेख 2) आयुब मुसा शेख 3) सागर पंढरपुरे 4) इरफान पंढरपुरे 5) इकबाल पंढरपुरे 6) मुसा शेख 7) अबुजर इकबाल पंढरपुरे व एक महिला सर्व रा. शिवपुरी रोड उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी अस्लम ईस्माईल शेख रा. हनुमान नगर उमरगा यांचे मध्यस्थीने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन आरोपीतांनी संगनमत करुन गैरकायदयाची मंडळी जमवुन अस्लम ईस्माईल शेख रा यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने मारहान करुन जखमी केले. व हातातील दगडाने व विटाने घराचे दरवाज्याला मारुन नुकसान केले. व तुमच्या मध्यस्थीने घेतलेले हातउसने घेतलेले पैसे परत देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा परत पैशाचा विषय काढला तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणुन अस्लम ईस्माईल शेख यांचे एम एल सी जबाबावरुन वरील आरोपीतांविरुध्द दिनांक 03.05.2019 रोजी पोलीस स्टेशन उमरगा येथे भादंविचे कलम 324, 141, 143, 147, 148, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।