परसोडी परिसरात तेंदुपत्याच्या शुभमुहर्तावर बिबट्याची दहशत कायम-परिसरात भीतीच वातावरण

0
623
Google search engine
Google search engine

निलेश मेश्राम/ चंद्रपूर :-

वनविभागाकडून होतेय गस्तीची मागणी
परिसरातील तेंदूपत्ता बंद व्हावा अशी होतेय मागणी

:- गोंडपीपरी तालुक्यातील परसोडी येथे नुकतीच वाघाने मारलेली घटना ताजी असताना ७ मे २०१९ ला सायंकाळी ९ वाजता सुमारास जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा परसोडी च्या काही अंतरावर एका दुचाकी स्वराला बिबट्याचे दर्शन झाले असून दुचाकीस्वार हा विरुर गावाला जात होता तोहगव मार्गे जात असताना मुख्य मार्गावर बिबट्या चे दर्शन झाले असल्याने दुचाकीस्वार यांनी गावाच्या दिशेने आपले वाहन वडवुन गावात माहिती दिली असता घटनास्थळी गावकर्यांनी धाव घेतली,तेवढ्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता त्यानि दुर्लक्ष करीत घरूनच मोबाईल वर संभाषण करताना दिसून येते,तर परसोडी गावात धसतीचा वातावरण निर्माण झाला आहे,तरी तेंदू हंगामाला परिसरात सुरवात झाली असता ह्या तेंदू पत्या हंगामात वन्यप्राण्यांचा कुणावर हल्ला होणार हे सांगता येत नाही,बिबट चे झालेले दर्शन गावातील लोक भयभीत झाले आहेत,