देवश्री देऊळकर जवाहर नवोदय विद्यालयतुन प्रथम – दहाविच्या सीबीएससी निकालामध्ये उत्तुंग भरारी

126
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (विठोबा) येथील राहिवासी व जिल्हा परिषद शाळेवर असलेले शिक्षक प्रकाश देऊळकर यांची मुलगी देवश्री देऊळकर हिने अमरावती येथील जवाहर नवोदय विद्यालयातुन दहाविच्या सीबीएससीच्या निकालात प्रथम येण्याचा मान मिळविला. नुकत्याच घोषित झालेल्या निकालामध्ये देवश्रीला ९७ टक्के गुण मिळाले. मराठी विषयामध्ये तिला पुर्ण १०० गुण, सामाजिक शास्त्र मध्ये ९८, गणितमध्ये ९७ गुण व विज्ञान व इंग्रजीमध्ये प्रत्येकी ९५ गुण मिळाले. ती आपल्या यशाचे श्रेय आई – वडील व शिक्षकांना देते. देवश्रीने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे श्री अवधुत संस्थान सावंगा विठोबा, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले असुन तिच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।