क्रिडा संकुलमध्ये उन्हाळी प्रशिक्षण शिबीर संपन्न

0
494
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

तालुका क्रीडा संकुल समिती, आझाद हिंद क्रीडा मंडळ वुशु असोशीएशन व अमरावती जिल्हा टेनिस/लेदर बॉल क्रिकेट असोसिएशन, चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल येथे उन्हाळी शिबिराचे आयोजन ८ मे ते १८ मे या कालावधीत करण्यात आले होते. याचा समारोप नुकताच करण्यात आला.

सदर शिबीराचे उद्घाटन ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रिडा अधिकारी बडवे तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रशांत गुडधे, रूपेश धारपगार, नंदू सोरगिवकर, देवेंद्र मेश्राम, संदिप शेंडे, नितेश गुप्ता, विजय मोटे आदींची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये शिबीरार्थ्यांना बॅडमिंटन, कबड्डी, टेनिस बॉल क्रिकेट या खेळांचे प्रशिक्षण दिल्या गेले असुन प्रमाणपत्र सुध्दा देण्यात आले. शिबीर यशस्वीरित्या पुर्ण झाल्यानंतर आयोजीत समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणुन परिक्षीत जगताप, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रिडा अधिकारी बडवे, नगरसेवक गोटु गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन नंदू सोरगिवकर तर आभार प्रदर्शन शुभम काविलकर याने केले. सदर शिबीर यशस्वी करण्याकरिता प्रशिक्षक नंदू सोरगिवकर, संदीप शेंडे, देवेंद्र मेश्राम, नितेश गुप्ता आदींनी अथक परिश्रम घेतले.