सौंदळ रोपवणात रोपे न लावताच निधीची उचल – अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

0
1043
Google search engine
Google search engine

सडक अर्जुनी :-निलेश मेश्राम – 
तालुक्यातील सौंदळ सहवनक्षेत्रात रोपे न लावताच पैस्याची उचल केल्याची चर्चा सध्या तालुक्यात होत आहे,संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे,सडक अर्जुनिचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोर्वधन राठोड यांच्या अधिकारातील सौंदळ सहवनक्षेत्र कंपार्टमेंट क्र,१६० मधील कृत्रिम पुनर्निर्मिती अंतर्गत मिश्र रोपवन भाग १ व २ मध्ये प्रत्येकी २७ हजार ७७५ रोपे २५ हेक्टरवर लावले असून रोपांतील अंतर ३ बाय ३ असल्याचे धकविले आहे, पण प्रत्येकसात १०हजार रोपे लागवड केली नसल्याचे दिसत आहे, सौंदळ चे छेत्रं सहायक पुरसोतम मेंढे हे आहेत, गेल्या दोन वरसपूर्वी खडे खोदकाम न करता पैश्याची उचल केल्याचे चर्चेत आले आहे, रोपवन तपासणी करता येणाऱ्या अधिकाऱ्याला रोपवन लावले असल्याचे दिसायला पाहिजे म्हणून दर्शनी भागात रोपवन लावले असल्याचे दिसत आहे,रोपवणात लावण्यासाठी रोपवाटिकेतून रोपाची वाहतूक करून त्याच रोपवणात ते रोपे ४०/५० गटातील एका झुडपात आजही ठेवले आहेत, रोपवणात लावलेली रोपांची निगा ठेवण्यासाठी विडिंगचे काम मागील महिन्यात करण्यात आले होते त्यातही बोगस मजूर लावून पैश्याची उचल केली आहे, हा संशोधनाचा विषय आहे, कृत्रिम पुनर्निर्मिती रोपवणात आता झुडपी जंगल वाढले आहे या दोन्ही रोपवणात प्रत्येकी २७ हजार ७७५ रोपे लावले असल्याचे मोठे फलक लावायला अधिकारी विसरले नाहीत हे मात्र विशेष !

सडक अर्जुनिचे लागवड अधिकारी यांनी रोपांची तपासणी न करता पैशे कसे काढले ?
हा विषय पुढे येत आहे,रोपवणात रोपे न लावता पैसे काढणाऱ्या अधिकाऱ्यावर नागपूरच्या मुख्य वनरक्षक कल्पना कुमार या काय कार्यवाही करतात ते जनतेचे लक्ष लागले आहे,