*अमरावती जिल्ह्यात ४५ हजार शेतकर्‍यांच्या बैंक खात्यात तुर आणि हरभरा च्या अनुदानाची रक्कम जमा*

0
627
Google search engine
Google search engine

अनुदान रक्कम न मिळालेल्या पात्र शेतकर्‍यांनी खरेदी केन्द्रावर संपर्क साधण्याचे कृषी मंत्र्यांचे आवाहन

मुंबई :-
तुर आणि हरभरा च्या अनुदानाचा अमरावती जिल्ह्यातील ४५ हजार १२४ पात्र शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. या शेतकर्‍यांच्या बैंक खात्यात आतापर्यंत ६२ कोटी ६१ लक्ष रूपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील ज्या शेतकर्‍यांच्या बैंक खात्यात तुर आणि हरभरा च्या अनुदानाची रक्कम तांत्रिक अडचणीमुळे जमा झालेली नाही अशा शेतकर्‍यांना राज्य शासनामार्फत तालुका खरेदी केन्द्रावरून अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या करीता शेतकर्‍यांना त्यांचे आधारलींक बॅंक खाते आणि आधारकार्ड ची सत्यप्रत खरेदी केन्द्रावर जमा करावयाची आहे.
ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही ज्या शेतकर्‍यांची तुर आणि हरभरा खरेदी करण्यात आला नाही अशा पात्र शेतकर्‍यांनी तालुक्याच्या खरेदी केन्द्रावर जाऊन अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषीमंत्री ना अनिल बोंडे यांनी केले आहे. तुर आणि हरभरा च्या अनुदानाचे अमरावती जिल्ह्यात ४८ हजार ७३६ पात्र लाभार्थी आहे. या पैकी तुरीच्या अनुदानाचे ३०५२९ लाभार्थी पैकी २८४५६ शेतकर्‍यांना ३९ कोटी २७ लक्ष रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणीमुळे २०७३ शेतकर्‍यांच्या बैंक खात्यात २ कोटी ८६ लक्ष रूपयांचे अनुदान जमा झालेले नाही. तसेच हरभरा च्या अनुदानाचे अमरावती जिल्ह्यात १८२०८ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्या पैकी १६६६८ शेतकर्यांच्या बॅंक खात्यात २३ कोटी ३४ लक्ष रूपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे १५४० शेतकर्‍यांच्या बैंक खात्यात तुर २ कोटी १३ लक्ष रूपयांची रक्कम जमा झालेली नाही, असे कृषीमंत्री ना अनिल बोंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून कळविण्यात आले आहे.