कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सचिव लेखापाल व कर्मचाऱ्यांसह 17 संचालकांवर झाला गुन्हा दाखल

0
1328
Google search engine
Google search engine

धामणगाव रेल्वे: संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या 2 कोटी 99 लाख रुपयाचा शेतमाल तारण अफरातफर प्रकरनात आज दत्तापूर पोलिसांनी धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मोहन इंगळे सचिव प्रवीण वानखडे लेखापाल प्रेमशंकर पांडे यांच्यासह 17 संचालकांवर तब्बल 6 विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

घोटाळ्यांच्या केंद्रस्थान ठरलेल्या धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हक्काच्या तारण योजनेत प्रचंड घोटाळा झाला असून सुमारे 2 कोटी 99 लाख रुपयांची अफरातफर सभापती सचिव व इतर यांच्या माध्यमातून झाली होती सदर प्रकरणात वरिष्ठ आदेशावरून लेखापरीक्षण अधिकारी श्री अशोक माकोडे यांनी दिनांक 3 जुलै रोजी सभापती सह अन्य लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सुद्धा दाखल केली होती मात्र सदर तक्रारीबाबत जिल्हा उपनिबंधकांना मार्गदर्शन मागून सभापती मोहन इंगले,सचिव प्रवीण वानखड़े,रोखपाल प्रेमप्रकाश पांडे, गोडाऊन किपर व 17 संचालक यांच्या विरुध्द पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहे. यासंदर्भात आरोपींच्या संख्येमध्ये चौकशीदरम्यान आणखी नावे वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकारांकडून वक्त करण्यात येत आहे. दरम्यान दत्तपुर पोलिसांनी 2 कोटी 99 लाख रुपयांच्या अफरातफर प्रकरणी भादवी 420,408,409,468,469,471 आणि 34 अनव्ये गुन्हे दाखल केले सून अधिक तपास ठाणेदार रवींद्र सोनवणे करीत आहेत.यासंदर्भात दत्तापूर पोलिस ठाण्यात सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक अशोक माकोड़े यांनी तक्रार दाखल केली होती.