शेतकऱ्यांच्या प्रलबिंत मांगण्याकरिता “प्रहार” प्रशासनाला इशारा – दर्यापुर तहसिलदारांना निवेदन

0
579
Google search engine
Google search engine

 दर्यापुर – 

शेतकऱ्यांच्या विविध मागंण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप पडतकर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते दर्यापुर तहसिलवर धडकले होते. यावेळी तहसिलदार अमोल कुंभार यांना निवेदनातुन शेतकऱ्यांच्या विविध मांगण्याबांबत इशारा देण्यात आला.

पिक कर्जमाफी ३० जुन २०१६ पर्यंत असतांना सुध्दा बँका ३० जुन २०१५ पर्यंत ग्राह्य धरत आहे.त्यात पुनर्गठन केलेले शेतकरी जास्त असून ३० जुन २०१६ पर्यंत थकीत ग्राह्य धरून त्यांना पिक कर्ज वाटप करावे, प्रधानमंत्री किसान योजना अंतर्गत २ हेक्टरच्या आतील व २ हेक्टरपेक्ष्चा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कोऑपरेटिव्ह बँकेतुन व स्टेट बँकेतुन अनुदान मिळाले नाही, मागील तुरीचे अनुदान मिळाले नाही, २०१६,१७ चे शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही, या वर्षीच्या हंगामात सध्या स्थितीत पेरलेली पिके पाऊस नसल्याने करपत आहे.त्यामुळे त्या पिकांचा तात्काळ सर्व्हे करण्यात यावा व यावर्षीची विम्याची मुदत २४ जुलैच्या पुढे वाढवुन देण्यात यावी आदी विषयांवर प्रहार संघटनेचे पदाघिकारी तहसिल कार्यालयावर धडकले होते. यावेळी तहसिलदार अमोल कुभार यांना निवेदन देण्यात आले.या मांगण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी दिला. शिष्टमंडळात निवेदन सादर करतांना प्रदीप वडतकर ,महेश कुरळकर ,दिनेश म्हाला,सुधीर पवित्रकार, बापूसाहेब साबळे , योगेश चोरेः सुधीर फुके, अनुप गावंडे ,अनिल गावंडे ,पप्पू पाटील,अंकुश गावंडे, अमीत धांडे, दिगंबर काळदाते ,कुलदीप साबळे, प्रफूल्ल गावंडे,आदी कार्यकर्त्यांची उपस्थित होती.