गणेशपूर -सावंगी येथे विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न-डॉ. वसुधाताई बोंडे यांचे हस्ते संपन्न

0
576
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:-

वरुड तालुक्यातील पुसला जिल्हा परिषद सर्कल मध्ये गणेशपूर व सावंगी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकापर्ण सोहळा डॉ. वसुधाताई बोंडे यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये गणेशपूर भागवत सोमकुवर ते सावंगी कडे जाणारा रस्ता ८ लक्ष रुपये, गणेशपूर ग्रामपंचायतच्या जागेवर सभागृह बांधकाम करणे १० लक्ष रुपये, सावंगी येथे सावंगी ते दाभी रस्ता १३ लक्ष रुपये, शिवमंदिराचे सभागृहाचे लोकापर्ण करणे १० लक्ष रुपये चा सोहळा संपन्न झाला.

यावेळी उपस्थित नागरिकांना डॉ. वसुधा बोंडे यांनी मार्गदर्शन केले, व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. व लवकरच त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात येण्याचेही सांगितले. सोबतच इंद्रभूषण सोंडे यांनी सुधा उपस्थिताना मार्गदर्शन केले, यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार राउत, भाजप महिला तालुकाध्यक्ष ज्योती कुकडे, भाजप महिला वरुड शहराध्यक्ष माधुरी भगत, गणेशपुरचे सरपंच संजय बंदरे, सावंगीचे सरपंच सुनील गावंडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष गजानन डहाके, दक्षता समिती अध्यक्ष स्वप्नील मांडळे, आत्मा अध्यक्ष शालिनी चोबितकर, शंकर चोबितकर, रुपाली सोंडे, कमलेश राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीयेतेकरिता राजू धोटे, अरुण मांडवे, राहुल शेळके, अशोक कोल्हे, सुनील निमजे, माधव कुरवाडे, साहेबराव कानडे, नरेंद्र कावलकर, गायकी गुरुजी, म्हस्के गुरुजी, बंडू कोल्हे राजू गोडबोले, दीपक बोरकर, सुरेश पाटील, भागवत सोमकुवर, राजेंद्र कळंबे, रमेश फरकाडे, अतुल महल्ले, महदेव मालखेडे, सुनील चौधरी, संजय जिचकार, मारोती नंदाने, अशोक कुरवाले, नरेंद्र जिचकार, साहेबराव वैद्य आदींनी परिश्रम घेतले