*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य-उद्या वरुड येथे कृषीमंत्रीच्या हस्ते शेकडो गुणवंत विद्यार्थांचा सत्कार*

180
जाहिरात

वरुड :-

भारतीय जनता पक्ष वरुड तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य वरुड तालुक्यातील गुणवंत विध्यार्थांचा करण्याचे भाजप युवा मोर्चाने ठरविले आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते ह्या सत्कार समारंभाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे कर्त्यवदक्ष मुख्यमंत्री यांनी पदाधिकारी यांना आवाहान केले होते कि, त्यांच्या वाढदिवसाला पोस्टर लावून आपले पैसे खर्च करू नका तर ते पैसे गरजू लोकाना मदत करा, मुख्यमंत्री सहायता निधी करता पैसे जमा करा. त्यामुळे युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यातील ७०% च्या वर दहावी व बारावी च्या गुण प्राप्त विद्यार्थांचा सत्कार करणार आहे, ह्या सत्कारामध्ये दहावी मधील प्रथम तीन व बारावी मधील प्रथम तीन विद्यार्थांना सिल्ड, शालेय बग्स व प्रमाणपत्र व बाकी विद्यार्थांना शालेय बग्स व प्रमाणपत्र सत्कार म्हणून देणार आहे. सदर कार्याक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री, शिवाजी कुचे व डॉ. नरेशचंद्रजी काठोळे हे गुणवंत विद्यार्थांना मार्गदर्शन करणार आहे. दहावी व बारावी मध्ये ७०% च्या वर प्राप्त विद्यार्थांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहान भाजप युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मातोश्री त्रिवेणी महिला सूतगिरणीच्या अध्यक्ष वसुधाताई बोंडे, प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद वरुड चे नगराध्यक्ष सौ. स्वातीताई आन्डे, शेघाट नगरीचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ. अंजलीताई तुमराम, पंचायत समिती सदस्य चैतालीताई ठाकरे, पंचायत समिती सदस्य ललिताताई लांडगे, भाजयुमो जिल्हाउपाध्यक्ष रविराज पुरी, भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राउत, भाजप महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई कुकडे, भाजप वरुड शहराध्यक्ष राजू सुपले, भाजप महिला शहराध्यक्ष माधुरीताई भगत, शेघाट चे शहराध्यक्ष निलेश फुटाणे, शेघाट महिला शहराध्यक्ष नीलिमाताई कुबडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मनोज माहूलकर, भाजयुमो शहरध्यक्ष निलेश अधव उपस्थित राहणार आहे,

— —–

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।