वनवासी एकलव्य छात्रावासला जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने धान्यदान

0
566
Google search engine
Google search engine

आकोटःता.प्रतिनिधी:-

स्थानिक पोपटखेड मार्गावरील वनवासी एकलव्य छात्रावासला आकोला जिल्हा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने ३ क्विंटल गहू, ४क्विंटल तांदूळ,१२५ किलो तुरदाळ धान्यदान देण्यात आले. दरवर्षी आकोला जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने धान्यदान व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एकवही एकपेन, आणी कपडे वाटत करण्यात आले.

जेष्ठ नागरिक संघाचे आकोला जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम खोत, दिलीप काकडे,प्रमोद देशमुख,प्रभाकर पाटणकर,  चंद्रकांत कुलकर्णी,  सुहासजी काटे, पुरुषोत्तम खोत, संध्याताई संघवाई,आकोट चे सुधीरजी महाजन अन्य २० जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थित धान्य देण्यात आले.यावेळी.जेष्ठ नागरिकांद्वारा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात यामध्ये१०वी पास झालेल्या हिमंत चुलपार या विद्यार्थ्यांचा सत्कार चंद्रकांत कुलकर्णी व प्रमोदराव देशमुख यांनी घडयाळ भेट देऊन केला.
.
याप्रसंगी संघाचे पदाधिकारी ,सुहास काटे, पुरुषोत्तम खोत यांनी छात्रावासातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.छात्रावास सामितीचे सचिव गोपाल गांधी, माहिला सामितीचे अध्यक्ष सौ.सुनिता राठी यांनी आकोला जेष्ठ नागरिक यांच्या कडून ३क्वि.गहू, ४क्वि.तांदूळ,१क्वि.२५किलो.तुरीची दाळ असे धान्यदान स्विकारले.

याप्रसंगी एकलव्य छात्रावासाचे कार्यकर्ते ,अभिमन्यु भास्कर आकोट तालुका संघचालक सुधीरजी महाजन,, विनयजी जोशी, , गजानन सोलकर, .जेष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण वाकोडे, सुखदेवरावजी म्हैसणे,साहेबराव खेडकर,देविदास खेरोकारे उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर आकोला जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी छात्रावासातील विद्यार्थ्यांन सोबत जेवणाचा आंनद घेतला.