राज्यस्तरीय रायफल शुटिंगमध्ये स्पर्धेत सोहम देशमुखला सुर्वण पदक

116

अकोला (प्रतिनिधी )

नाशिक येथे दिनांक 25 ते 28 जुलै रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय रायफल शूटिंग मध्ये छत्रपती शिवाजी शूटिंग रेंज अकोल्याचा सोहम राजेश देशमुख ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक पटकावले नाशिक येथील बिशमराज बाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र रायफल असोसिएशनकडून रायफल शूटिंगचे सामने आयोजित करण्यात आले होते यामध्ये ओपन साईट प्रकारांमध्ये सोहम देशमुख याने 400 पैकी 354 गुण प्राप्त करून चांगली कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले याप्रसंगी त्याला आयोजकाकडून सुवर्णपदक प्रशस्तीपत्र व प्रिसिहोल कंपनी कडून रायफल भेट देऊन सन्मानित करण्यात आले सोहम देशमुख हा प्रभात किड्स अकोला चा विद्यार्थी असून तो त्याच्या यशाचे श्रेय छत्रपती शूटिंग रेंजचे प्रशिक्षक विन्सैन्ट अमेर सर प्रभात किडसचे गजानन नारे सर यांना देतो सोहमला मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे प्रशिक्षक विन्सैन्ट अमेर सर, हरणे सर,प्राचार्य म्हैसने सर, पावडे सर तसेच शुटिंग रेंजचे सदस्य व सर्व खेळाडू यांनी त्याचे कौतुक केले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।