गुंजेवाही पवना परीसरात वाघाची दहशत एकाचवेळी तिन बैल ठार तर एक जखमी

260
तालुका प्रतिनिधी:- सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही क्षेत्रातील गुंजेवाही पवना परिसरात वाघाच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार तर एक बैल जखमी झाल्याची घटना घडली.
गुंजेवाही क्षेत्रातील कोठा पवना परीसरात वाघ व पिल्लाचा वावर आहे. काल सायंकाळच्या सुमारास गुराखी जनावरे घेऊन येत असताना वाघाच्या परिवाराने  एकाच वेळी हल्ला करून तिन बैलांना ठार केले तर एक बैल जखमी अवस्थेत घरी आला.
       एकाच वेळी तीन बैल ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात बैलाला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्यांना शेती कशी करायची याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वनपाल कुळमेथे यांनी चौकशी करीता वनरक्षक धात्रक यांनी पाठवून घटनेचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळुन देण्याची कार्यवाही केली आहे.
जाहिरात