योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका येथे ऋषिपंचमी महोत्सवास सुरवात – हभप गणेश महाराज शेटे यांच्या सुमधुर वाणीतुन संगितमय श्रीमद भागवत कथा

0
709
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनिधी

तालुक्यातील वरुर जऊळका येथिल योग योगेश्वर संस्थान येथे ऋषिपंचमी महोत्सवास उत्साहात सुरवात झाली असुन महोत्सवानिमित्य दि.२७ ते ३ सप्टे.विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.महोत्सवात योग योगेश्वर संस्थानचे अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांच्या सुमधुर वाणीतुन संगीतयम श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे.या कथेतील रंजक प्रसंगांनी भाविक हे मंत्रमुग्ध होत असुन कथेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.याशिवाय महोत्सवात भागवत सप्ताहअंतर्गत दररोज स.५ ते ६ काकडा, स९ते ११ विजयग्रंथ पारायण दु २ ते ५भागवत कथा, ५ते ६ हरीपाठ , रा.८ ते १० हरी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.हरीकिर्तनाच्या कार्यक्रमात प्रख्यात किर्तनकारांच्या किर्तन सेवा भाविकांना मंत्रमुग्ध करत आहेत.याअंतर्गत दि.२७, दि.२८ हभप विशाल महा.खोले., दि.२९ हभप अरुण महा., दि.३०हभप तुकाराम महा.मुंडे दि.३१भरत महा.पाटील , दि.१ हभप महेश महा.मारवाडी , दि.२ हभप अभिनव महा.तर दि.३ हभप गणेश महाराज शेटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.तसेच दि.३ ला.श्रींच्या पादुका व मुखवट्यासह
भव्य दिंडी सोहळ्याने महोत्सवाची सांगता होणार आहे.