ब्राम्हन वाडा थडी येथे बाजारात शिरले नाल्याचे पाणी, दुकानदार यांचा माल गेला वाहून रवींद्र औतकर :-ब्राम्हणवाडा थडी

0
737
Google search engine
Google search engine

ब्राम्हन वाडा थडी येथे बाजारात शिरले नाल्याचे पाणी,
दुकानदार यांचा माल गेला वाहून

रवींद्र औतकर :-ब्राम्हणवाडा थडी

दुपारी 12 वाजता पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी गावात नाल्याचे पाणी शिरले.आज गुरुवार दिवस हा येथील आठवडी बाजराचा दिवस असल्याने या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे यांनी आपले दुकान लावले होते.मात्र नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा जोर इतका होता की दुकान मधील माल वाहून गेला.

या गावात 2007 मध्ये मोठ्या प्रमाणात नदीच्या पुराचे पाणी शिरले होते.तेव्हा पासून या गावात आज पाणी शिरले मात्र या गावात प्रशासन याच्या सतर्क च्या भूमिका बाजवणारे तलाठी,ग्रामसेवक,ये मुख्यलयीन नव्हते.त्यामुळे काही हानी झाल्यास याची माहिती वरिष्ठ कधी कधी पोहचणार अशा प्रश्न गावातील नागरिक पाणी शिरल्यावर करीत आहे.

नाल्याचे पाणी अधिक जास्त असल्याने याचा वेळ अधिक होता.तर माजी पंचायत सभापती जिजाबाई टिंगणे याच्या घरा च्या पायरी पर्यत मोठ्या नाल्याचे पाणी वाहत होते.तर पूर्णा मध्यम प्रकल्प मधील जलसाठा हा 90% जवळपास गेला असल्याने हा गावाला सतर्कतेचा इशारा मध्यम प्रकल्प कडून देण्यात आला आहे.

गावात पाणी शिरले फोटो मेल केला आहे.